Tarun Bharat

कोल्हापूर : बिगरशेतीची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एकास अटक

Advertisements

वार्ताहर/गोकुळ शिरगाव

बिगरशेतीची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एकास गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली. गजानन रवींद्र पाटील ( वय 33, रा. शिवाजी गल्ली, कणेरी ता.करवीर) असे या अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून संगणक व प्रिंटर जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बेबीताई श्रीकांत मांडरेकर (रा. नेर्ली तालुका करवीर) यांचे मालकीची र्नेली येथे जमीन आहे. येथील जमीन गटनंबर 623 क्षेत्र झिरो पॉईंट 37. 89 पैकी झिरो पॉईंट 21 झिरो झिरो बिगर शेती प्रकरण चौकशी करीत असताना सदर प्रकरणाचे चौकशीअंती अर्जदार यांचे जमिनी बाबतचा अकृषक बिगर शेतीचा आदेश आरोपी गजानन पाटील याने आपण जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करीत असल्याची बतावणी करून दोन बिगर शेती अकृषक आदेश तयार करून त्यावर तहसील कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसिलदार सचिन गिरी ,शितल मुळे भामरे यांची बोगस सही करून दिली. सदर बाबत यातील फिर्यादी मांडरेकर यांनी आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करणे बाबतचा आदेश तहसीलदार करवीर यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण, सहाय्यक फौजदार मानसिंग राजपूत ,बाजीराव पोवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप जाधव, पोलीस नाईक अरुण नागरगोजे, संतोष तेलंग नितीन सावंत ,संदीप जाधव ,यांनी आरोपीचा शोध घेऊन गजानन यास अटक केली.

आरोपी पाटील याने भूधारकांना बनावट अकृषक बिगगर शेतीचे आदेश त्याचे पोवार माळ कणेरी येथील राहते घरात त्याच्या वापरातील संगणक प्रिंटर ,स्कॅनर, कॉपी व पेन ड्राईव्हमध्ये करून शिक्के तयार करण्याचे मशीन खरेदी करून त्या मशीनमध्ये स्वतः आरोपीने शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीकडून त्याचे वापरातील संगणक प्रिंटर पेन ड्राइव शिक्के तयार करण्याचे मशीन व त्याचे साहित्य व बनावट तयार केलेले शिक्के असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Related Stories

कोरेगाव शहरात दोन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा

Patil_p

पाणीपुरवठा, घरफाळा, इस्टेट वसुलीत फेल; वर्ष संपत आले तरी 50 टक्केही वसुली होईना

Sumit Tambekar

कोल्हापूर : म.फुले स्मृतीदिनी शिक्षक दिन साजरा करावा

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री ठाकरे घेणार राज्यपालांची भेट

datta jadhav

औरंगाबादमध्ये प्रत्येक शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन

Rohan_P

राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याकरिता नोंदवा तुमचे मत!

datta jadhav
error: Content is protected !!