Tarun Bharat

कोल्हापूर : भोगावती नदीत दोन म्हैशींसह रेडीचा बुडून मृत्यू

वार्ताहर / आवळी बुद्रुक

राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील भोगावती नदीतील पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न लागल्यामुळे दोन म्हशी व एक रेडी पाण्यात बुडून मेल्या . कृष्णा दत्तू सायेकर यांच्या मालकीच्या या म्हशी असून त्यांचे यामुळे दीड लाखांचे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सायेकर हे आज सकाळी अकरा वाजता तीन जनावरे घेऊन नदीला गेले होते. रोजच्या सवयीप्रमाणे पाणी पिण्यासाठी ही जनावरे नदीत गेली.पण मोठ्या प्रवाहामळे ती वाहून जावू लागली. थोड्या अंतरावरील सरनोबतांची मळी शेता जवळ ती पोहोचली पण त्यांचे गळ्यातील दोर तेथील झाडाना अडकून ती तेथेच बुडाली. दरम्यान ही घटना समजताच माजी उपसरपंच संभाजी पाटील, आनंद जोशी, सुरेश सायेकर, बाजीराव जोशी, विकास बावडेकर यांनी मेलेल्या जनावरांचे दोर कापून बाहेर काढण्यात आले.

Related Stories

गोकुळचा बायोगॅस प्रकल्प दूध उत्पादकांसाठी फायदेशीर

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिह्यातील कोरोना मृत्यू संदर्भात विभागीय डेथ कमिटीची झाडाझडती

Archana Banage

चित्रा वाघ म्हणतात, क्या हुवा तेरा वादा….जयंतरावजी..

Archana Banage

पश्चिम महाराष्ट्र पूरस्थिती टाळण्यासाठी जयंत पाटील यांनी घेतली आढावा बैठक

Archana Banage

महागाईचा भडका : जीवनावश्यक वस्तु ही महागल्या

Abhijeet Khandekar

सोळांकूरात थेट पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी रोखले

Abhijeet Khandekar