Tarun Bharat

कोल्हापूर : सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन विरोधात मराठा आक्रमक

मराठा क्रांती मोर्चाची सुर्या हॉस्पिटलच्या दारात  निदर्शने : डॉ. तन्मय व्होरा यांचा निषेध

कोल्हापूर / प्रतिनिधी

मराठा आरक्षणा विरोधात भुमिका घेणाऱया सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन संस्थेच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भुमिका घेतली. संघटनेचे पदाधिकारी असलेले डॉ. तन्मय व्होरा यांच्या दसरा चौक परिसरातील सुर्या हॉस्पिटलसमोर मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बुधवारी जोरदार निदर्शने केली. यावेळी संतप्त झालेले दिलीप पाटील, सचिन तोडकर यांच्यासह मराठा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखले. कार्यकर्त्यांनी डॉ. व्होरा यांनी समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी केली. डॉ. व्होरा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

    मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढÎात सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन संस्थेने नेहमीच विरोधी भुमिका घेतली आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. तसेच या संस्थेने मुख्यमंत्री यांना पाठविलेले पत्रच प्रसार माध्यमांना सादर केले. पत्रातील मजकूर असा ः मराठा आरक्षण रद्द झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे अनिश्चितता संपली असून राज्यातील भरती प्रक्रीया तत्काळ सुरु करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रीयेत विलंब, दिरंगाई, चालढकलपणा चालणार नाही. राज्य सरकारने कोणतीही पुनर्विचार याचिका दाखल करणे, राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडून अपेक्षित कार्यवाही होणे, नवा मागासवर्गीय आयोग नेमून काही करणे, अगदी मराठा जातीला ओबीसी घोषित करणे इत्यादी कुठलाही मार्ग स्विकारला तरी मराठा आरक्षण कायदा 2018 व त्याद्वारे देऊ केलेले आरक्षण आता लागू करता येणार नाही. सर्व एसईबीसी याद्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मराठा जातीसाठी आरक्षित पदे गुणवत्तेनुसार भरली जाणार आहेत, अशी घोषणा करावी, याबाबत सर्व विभागांना कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशा विविध मागण्या या पत्राद्वारे सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  केल्या आहेत. 

   हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न

   पत्राबाबत माहिती मिळताच मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील, सचिन तोडकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांनी डॉ. व्होरा यांच्या लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथील हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलीसांनी रोखले. यावेळी पोलीसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मराठा कार्यकर्त्यांनी डॉ. व्होरा यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. त्यानुसार पोलीसांनी डॉ. व्होरा यांना कार्यकर्त्यांसमोर हजर केले.

  डॉ. व्होरा यांच्याकडून दिलगिरी, मराठा आरक्षणाला पाठींबा

 डॉ. व्होरा यांनी यांसंदर्भात दिलेल्या पत्रात दिलगिरी व्यक्त करताना म्हटले आहे की, सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संस्थेने मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राबाबत आपल्याला कल्पना नाही. मराठा कार्यकर्त्यांकडूनच याबाबत माहिती मिळाली. त्यातील मजकूर समजला. त्याच्याशी मी अथवा माझे हॉस्पिटल सहमत नाही. ते पत्र पाठवताना माझ्याशी चर्चा अथवा विचार विनिमय झाला नव्हता. संस्थेचे लेटर हेडवर माझे नाव असले तरी मला माहिती न देता पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आले. त्यावर माझी स्वाक्षरी नाही. संस्थेशी माझा अर्थिक व्यवहार नाही. मी संस्थेला देणगीही दिलेली नाही. पत्रामुळे मराठा समाजाच्या भावान दुखावल्या असतील तर समाजाची दिलगिरी व्यक्त करतो. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट करत मराठा समाजाच्या आरक्षणास माझा पाठींबा असल्याचे डॉ. व्होरा यांनी सांगितले.

 सेव्ह मेरीटसेव्ह नेशनची नेहमीच मराठा विरोधी भुमिका दिलीप पाटील

  सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन या संस्थेने मराठा आरक्षणा विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्याअधी मराठा आरक्षण कायद्यानुसार मराठा उमेदवारांच्या नियुक्ता संरक्षित केल्या आहेत. त्यादेखिल रद्द करण्याची मागणी हि संस्था करीत आहे. संपूणं आरक्षण किंवा पदोन्नतीतील आरक्षणाला सेव्ह मेरीटवाले विरोध करत नाहीत. केवळ मराठा समाजाला टार्गेट करत आहेत. त्यांनी मराठा आरक्षण विरोधी याचिका कर्त्यांना फंडींगही केले आहे, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी केला.

  चौकट

  सेव्ह मेरीट विरोधात राज्यभर आंदोलन सचिन तोडकर

 सेव्ह मेरीटचे पदाधिकारी राज्यातील ज्या ठिकाणचे असतील त्या-त्या शहरात त्यांच्या विरोधात मराठा समाज आंदोलन करणार असल्याचे समन्वयक सचिन तोडकर यांनी सांगितले. 

Related Stories

मोहरे येथे अज्ञात वहानाच्या धडकेत मांगलेतील तरूण ठार

Archana Banage

विरोधकांच्या टीकेनंतर मंत्रिस्तरावरील अधिकारांबाबत मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “सचिवांना केवळ…”

Archana Banage

पट्टणकोडोलीत तीन पानी जुगार अड्यावर छापा

Archana Banage

भाजपच्या माजी मंत्र्याची गळा आवळून हत्या

datta jadhav

विश्वचषकाला अजून वेळ आहे, घरातच थांबा : रोहित शर्मा

prashant_c

जाखलेत रोटरीतर्फे विद्यार्थ्याना स्वेटर, ब्लॅकेटचे वाटप

Archana Banage