Tarun Bharat

कोल्हापूर : मलकापुरातील ‘त्या’ बेपत्ता युवकांचा मृतदेह सापडला

बंधार्‍यावरून पोहण्यासाठी उडी मारल्यानंतर चार दिवसांपासून होता बेपत्ता

प्रतिनिधी/शाहुवाडी

मलकापूर तालुका शाहूवाडी येथील निरंजन दिलीप कोठावळे (वय बावीस) हा युवक मलकापूर येळाने मार्गावरील बंधार्‍यावरून पोहण्यासाठी उडी मारून चार दिवसांपासून बेपत्ता झाला होता. आज, त्याचा मृतदेह कोपर्डे गावच्या हद्दीत चार दिवसानंतर सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार रविवार (दि.5 जुलै) रोजी सायंकाळी सात वाजता मलकापूर येळाने मार्गावरील बंधार्‍यावरून पोहण्यासाठी निरंजन याने उडी मारली होती. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने त्याचा शोध सुरु झाला. शाळी नदीचा वाढता पाण्याचा प्रवाह व पडणारा पाऊस यामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. सलग चार दिवस त्याची शोधमोहीम सुरू होती. अखेर चार दिवसांनी शाळी व कडवी नदीच्या संगमावरील कोपर्डे गावच्या हद्दीत गावातील नागरिकांना मृतदेह तरंगताना आढळून आला.

गेल्या चार दिवसापासून या युवकाच्या बेपत्ता होण्याने मलकापूर शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना ही जबर धक्का बसला होता. मृतदेह सापडल्याची बातमी समजताच बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Archana Banage

खासदार शरद पवार यांनी केले डाळिंब उत्पादकांचे कौतुक

Archana Banage

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून सीपीआरला 40 लाखांचा निधी

Archana Banage

सातारा शहरात आकर्षक विक्रीला मखर

Patil_p

त्यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, गावात फटाक्याची आतषबाजी

Archana Banage

पासार्डे येथील प्राथमिक शाळेची भिंत ढासळली

Archana Banage