Tarun Bharat

कोल्हापूर महापालिका घरफाळा प्रकरणातील संशयितांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात काम करणाऱ्या बड्या चौघा अधिकाऱ्यांनी शहरातील मालमत्ता धारकांची करारानुसार आकारणी न करता कमी दाखवून तसेच संगणक प्रणाली मध्ये चुकीच्या नोंदी करून महापालिकेची ३ कोटी १४ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून याप्रकरणातील आरोपींनी पलायन करुन, जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होवून हा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळुन लावला.

घरफाळा विभागात काम करणारे करनिर्धारक व संग्राहक दिवाकर बापुसो कारंडे (वय ५२ रा. तिवले गल्ली, कळंबा, ता. करवीर) अधीक्षक नितीन राजाराम नांदवळकर (वय ४८, रा. ब्रह्मपुरी शिवाजी पूल, कोल्हापूर) ,अधीक्षक अनिरुद्ध प्रमोद शेटे (वय ३५, रा. घाडगे कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, कोल्हापूर), कनिष्ठ लिपिक विजय तुकाराम खातू (वय ५२, रा. जरगनगर,कोल्हापूर) अशी चौघा संशयितांची नावे आहेत.

एक एप्रिल २०१४ ते ११ फेब्रुवारी २०२० या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या मुख्य कार्यालयात काम करताना संशयित दिवाकर कारंडे, नितीन नांदवळकर, अनिरुद्ध शेटे व विजय खातू या चौघानी संगणमत करून, शहरातील बड्या मिळकत धारकांना हाताशी धरून त्यांचा घरफाळा करारानुसार आकारणी न करता, त्यामध्ये कमी दाखवला काही मोठ्या मिळकतधारकांना सवलती देऊन त्यांच्याकडून आर्थिक लाभ उठवला. अशाप्रकारे पाच वर्षाच्या कालावधीत या चौघांनी संगणकामध्ये चुकीच्या नोंदी करून महानगरपालिकेचे ३ कोटी १४ लाख रुपयाचे नुकसान केले. घरफाळा विभागातील हा गैरव्यवहार लक्षात आल्यानंतर करनिर्धारक संजय भोसले यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार भोसले यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होता.

Related Stories

सातारा नगरपरिषदेमध्ये गुरुनानक जयंती साजरी

Patil_p

विज्ञान प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ

Archana Banage

सलग दुसऱया बाधित वाढ मंदावल्याचा मोठा दिलासा

Patil_p

यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल

Abhijeet Khandekar

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

Archana Banage

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ संशोधनांमध्ये देशात अव्वल – डॉ. अनिल सहस्रबुद्धे

Archana Banage