Tarun Bharat

कोल्हापूर महापालिका 65 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस

प्रतिनिधी / कोल्हापूर

उपआयुक्त शिल्पा दरेकर यांनी छत्रपती शिवाजी मार्केटमधील महापालिकेच्या विविध कार्यालयांची बुधवारी अचानक तपासणी करून सर्व कार्यालयातील हजेरी मस्टर जप्त केली. या तपासणीवेळी परवाना विभाग, इस्टेट विभाग, विभागीय कार्यालय क्र. 2, एल.बी.टी. विभाग, पेन्शन व फंड विभाग, घरफाळा विभागाकडील 55 कर्मचारी कार्यालयांमध्ये विहित वेळेत उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. तसेच विवाह नोंदणी विभाग व विधी विभागाच्या कार्यालयाचा दरवाजा वेळेत उघडला नसल्याने नागरिक कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करत असल्याचे दृष्टीक्षेपात आले.

त्यामुळे या दोन्ही विभागाकडील 10 कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांकडील अनेक कर्मचारी हे विलंबाने कामावर येत, कार्यालयीन वेळ संपण्यापुर्वी घरी निघून जातात अशा तक्रारी नगरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार दरेकर यांनी कारवाई केली.

Related Stories

जिल्ह्यात पावसाचे थैमान

Archana Banage

कोल्हापूर : पूर्व वैमनस्यातून भरदिवसा तरुणावर तलवार हल्ला

Archana Banage

कुरुंदवाडात धार्मिक एकात्मतेची वीण घट्ट, मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना

Archana Banage

राजर्षी शाहू महाराज, दीक्षित गुरूजी, तोफखाने मास्तर!

Archana Banage

उदगाव येथे कोरोना मृत्यूदेह नेण्यासाठी सहा हजार मागणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Archana Banage

सातवेसह नदीकाठच्या २३० गावांचा कुषीपंप वीजपुरवठा खंडित

Abhijeet Khandekar