Tarun Bharat

कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेत पहिली पासून `सेमी इंग्लिश’ सुरू करणार

उपायुक्त रविकांत आडसूळ यांची माहिती : केएमसी कॉलेजच्या दर्जा सुधारणेचेही लक्ष्य

प्रतिनिधी/कोल्हापूर

इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिशच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढत असल्याने महापालिकेच्या शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होत आहे. त्याला पर्याय म्हणून महापालिकेच्या शाळांत पहिलीपासून सेमी इंग्लिशची सुविधा देण्याच्या दृष्टीने विचार सुरू असून नवीन शैक्षणिक वर्षात त्याची सुरूवात होईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेकडून दिल्या जाणाऱया प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी डीजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्याकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या रविकांत आडसूळ यांच्याकडे महापालिकेच्या उपायुक्तपदाची जबाबदारी गेल्या महिन्यात देण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेचे सामान्य प्रशासन, कामगार विभाग, रचना कार्य पद्धत, आरोग्य विभागातील दिव्यांग योजना, अंतर्गंत लेखापरीक्षण, इस्टेट, प्राथमिक शिक्षण, केएमसी कॉलेज आणि केएमटी हे विभागांची जबाबदारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उपायुक्त आडसूळ यांच्यावर सोपविली आहे. भविष्यात आपल्या योजनांविषयी माहिती देताना आडसूळ म्हणाले, महापालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या कारणांचा शोध घेतला जाईल. सद्यःस्थितीत पालकांचा ओढा इंग्लिश अथवा सेमीइंग्लिश शाळांकडे वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांकडे असणारा ओढा कमी होतो आहे. त्यातही महापालिकेच्या काही शाळांची कामगिरी मोठी आहे. पहिलीपासून महापालिकेच्या शाळेत सेमी इंग्लिशची सुविधी दिली तर त्याचा लाभ समाजातील सर्व थरातील विद्यार्थी आणि पालकांना होईल, त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. सद्या महापालिकेच्या शाळेत ई लर्निंगचे प्रकल्प राबविले जात आहेत. पण ते शंभर टक्के राबविले जातील. त्यासाठी टेक्नोसॅव्ही शिक्षकांचा गुप तयार केला जाईल. शैक्षणिक गुणवत्ता वाढाठी डीजिटल प्लॅटफॉमचा वापर वाढविण्यात येईल. ऑनलाईन लर्निंगसाठी इफ्रान्स्ट्रक्चर लागेल. टॅब, ऍनरॉईड टीव्ही, सॉप्टवेअर आदीची सुविधा महापालिकेचा फंड, सीएसआरचा फंड अथवा सामाजिक संस्था, लोकसहभागातून राबविण्यात येईल.

उपायुक्त आडसूळ म्हणाले, केएमसी कॉलेजच्या शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेच्या वाढीसाठी नियोजन केले आहे. त्याचे परिणाम लवकरच दिसतील. केएमटीची जबाबदारी आहे. अडचणीत सापडलेल्या केएमटीच्या सेवा देण्याच्या पद्धतीत सुधारणा केली तर स्थिती बदलू शकते. त्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र त्याचे परिणाम दिसण्यास सहा महिने जावे लागतील, असेही उपायुक्त आडसूळ यांनी सांगितले.

Related Stories

एन. डी. साहेबांचा प्रवास माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा : राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

गायरान जमिनीच्या हद्दीच निश्चित नाहीत, तर अतिक्रमण हटवायचे कसे?

Archana Banage

कथित लव्ह जिहाद प्रकारणातील संशयिताला आठ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी

Archana Banage

‘रोटरी’तर्फे 24 व 25 रोजी बहिरेपणा निदान, श्रवणयंत्र तपासणी शिबिर

Abhijeet Khandekar

राजेश क्षीरसागरांच्या बंडाने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

Abhijeet Khandekar

कर्नाटकातील शाळा, पीयू महाविद्यालये डिसेंबरमध्येही उघडणार नाहीत

Archana Banage