Tarun Bharat

कोल्हापूर महापालिकेला मिळणार पर्मनंट जलअभियंता, आरोग्य अधिकारी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेला कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी आणि जलअभियंता मिळणार आहे. गेली अनेक वर्षे अन्य पदांप्रमाणे आरोग्य अधिकारी आणि जलअभियंता या महत्वाच्या पदांची जबाबदारी प्रभारी अधिकर्‍यांवर राहिली आहे. त्यामुळे कामावरही परिणाम होत आहे. या पदांवर कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार आरोग्य अधिकारी आणि जलअभिता पदावर पर्मनंट अधिकार्‍यांची नियुक्ती होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी किंवा त्यानंतर हे अधिकारी महापालिका सेवेत रूजू होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदावर गेली अनेक वर्षे प्रभारी अधिकारीच कार्यरत आहे. याआधीचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. रमेश जाधव, डॉ. कृष्णा केळवकर यांनी जबाबदारी पार पाडली. कोरोनाच्या काळात पुन्हा डॉ. दिलीप पाटील यांच्याकडेच जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यानंतर सध्या डॉ. अशोक पोळ प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हीच बाब जलअभियंता पदाबाबत आहे. याआधीचे मनिष पवार, सुरेश कुलकर्णी आणि गायकवाड यांनी प्रभारी जलअभियंता म्हणून काम पाहिल्यानंतर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे रूजू झाले. त्यांच्या जागी प्रभारी म्हणून उपशहर नगर रचनाकार नारायण भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही प्रभारींवर सुरू असलेल्या पदांवर आता पर्मनंट अधिकारी येणार आहेत.

तीन उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त

महापालिकेत सध्या निखिल मोरे, रविकांत आडसुळ, शिल्पा दरेकर हे तीन उपायुक्त आणि विनायक औंधकर, संदीप घारगे, चेतन कोंडे हे तीन सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत. त्यात आता पूर्णवेळ जलअभियंता आणि आरोग्य अधिकारी यांची भर पडणार आहे.

Related Stories

कोल्हापूर : वळीवडेत गावठी दारूसाठा जप्त; तरुणावर गुन्हा

Archana Banage

पिंपळगाव खुर्दमध्ये मुश्रीफ गटाची सत्ता; सरपंचपदी शीतल नवाळे विराजमान

Archana Banage

हणबरवाडीत 12 कोंबडय़ा मृत्युमुखी

Patil_p

राष्ट्रवादीच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल; हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल

datta jadhav

गोकुळकडून पुन्हा उच्च न्यायालयात धाव

Archana Banage

रेवंडे घाटात कोसळली दरड , रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प

Archana Banage
error: Content is protected !!