Tarun Bharat

कोल्हापूर महापालिकेला मिळणार कार्डियाक ऍम्ब्युलन्स

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेस कार्डियाक ऍम्ब्युलन्स घेण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी  23 लाख रूपयांचा निधी शुक्रवारी दिला. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सूपूर्द केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधी अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी एक कोटी रूपये खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयासाठी (सीपीआर)  वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्यासाठी 40 लाख 50 हजार रुपयांचा निधी दिला आहे, तर कोल्हापूर महापनगरपालिकेस 36 लाख रुपयांचा निधी दिला आहे.

कोरोनाच्या काळात कार्डियाक रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुस्रया रुग्णालयात हलविण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यातही यातील गंभीर रुग्णांना फुफ्फुस तसेच हृदयाशी संबंधित आजार असतात. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन आदी अद्ययावत सुविधा असलेली ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक असते; मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अशा रूग्णांना एका रुग्णालयातून दुस्रया रुग्णालयात नेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे औषधे, ईसीजी, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, सीरिज पंप यांसारख्या सुविधाने परिपूर्ण असलेली कार्डियाक रुग्णवाहिका कोल्हापूर महानगरपालिकेकडे असावी, असा मानस आमदार जाधव यांनी व्यक्त केला. यानुसार आमदार जाधव यांनी शुक्रवारी कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला 23 लाख रूपयांचा निधी दिला.

Related Stories

कुंभी साखरने त्वरित १०० रुपये बिल द्यावे

Archana Banage

अंबाबाई मूर्ती संवर्धनाची माहिती प्रथम न्यायालयाला द्यावी

Kalyani Amanagi

कोल्हापूर : ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी

Archana Banage

पोलिसांनी रोखल्याने मानखुर्द चेकपोस्टवर सदाभाऊ खोत यांचे ठिय्या आंदोलन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : अॅटीजेन किटची खरेदी प्रक्रिया पारदर्शकच

Archana Banage

कोरोना बाधितांकडे पाहण्याचा दृष्टिकोण समाजाने बदलने आवश्यक – खा. राजू शेट्टी

Archana Banage