Tarun Bharat

कोल्हापूर : महावितरणचे कंत्राटी कामगार लाचलुचपतच्या जाळ्यात

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

महावितरण कार्यालयातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयाचा पेन्शन प्रस्ताव मंजुरीला पाठविण्यासाठी पाचशे रुपयांची लाचे स्विकारल्या प्रकरणी महावितरणच्या दोघा कंत्राटी कर्मचाऱयांना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. चंद्रकांत ऊर्फ बाळू सात्ताप्पा मांढरेकर (वय 36, रा. केनवडे ता. कागल) आणि सुनील यशवंत हजारे (वय 30, रा. हुन्नुर ता. कागल) अशी त्या दोघांची नावे आहेत. ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाबाहेर गुरुवारी दुपारी ही कारवाई केल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयामध्ये संशयित चंद्रकांत ऊप्फ बाळू मांढरेकर शिपाई म्हणून तर सुनील हजारे हे टंकलेखक म्हणून कंत्राटी पद्धतीने कामास आहेत. तक्रारदारांचे वडील 2010 साली महावितरणमधून निवृत्त झाले. पण 10 वर्षानंतरही त्यांना पेन्शन मिळाली नाही. याबाबत तक्रारदाराने पेन्शन मिळण्यासाठीचा प्रस्ताव नोव्हेंबर 2020 मध्ये महावितरण कार्यालयातील मुख्य लिपिकाकडे सादर केला. त्यांनी काही दिवसांनी याबाबतची चौकशी केली. त्यांना हा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीला पाठविला असल्याचे सांगण्यात आले. याचा मोबदला म्हणून संशयित चंद्रकांत मांढरेकर व सुनील हजारे यांनी पाचशे रुपये लाचेची मागणी केली. याची तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. विभागाने मंगळवारी दुपारी महावितरण कार्यालयाबाहेर सापळा लावला. तक्रादरांकडून पाचशे रुपयांची लाच स्विकारताना संशयित चंद्रकांत मांढरेकर व सुनील हजारे यांना जेरबंद केले.

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यानेतृत्वाखाली सहायक फौजदार शाम बुचडे, कर्मचारी अजय चव्हाण, सूरज अपराध, कृष्णात पाटील, मयूर देसाई, संदीप पडवळ, रूपेश माने यांनी ही कारवाई केली.

Related Stories

नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होणार

Abhijeet Shinde

अर्जुनवाड व धरणगुत्तीमध्ये जुगार खेळणारे सव्वीस जण ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

पुरातत्व विभागाला जाग, ढासळणाऱया पन्हाळ्याचे ‘पुरातत्व’कडून तातडीने सर्वेक्षण सुरु

Rahul Gadkar

मृत्यूनंतरही त्यांने दाखवली घट्ट मैत्री

Abhijeet Shinde

अथायु’मध्ये हृदयावरएमआयसीएस’ तंत्राद्वारे तीन शस्त्रक्रिया यशस्वी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भुदरगड काँग्रेस कमिटीतर्फे राजीव गांधी जयंती साधेपणाने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!