Tarun Bharat

कोल्हापूर : महावितरणच्या मुख्य कार्यालयास उद्या टाळे

इरिगेशन फेडरेशनसह सर्वपक्षीय कृती समिती करणार आंदोलन, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी, कृषी पंपांच्या वीज जोडण्याही प्रलंबित, 10 हजार आंदोलक होणार सहभागी

प्रतिनिधी / कोल्हापूर:

लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांमध्ये दरमहा तीनशे युनिटस्च्या आत वीज वापर असणाऱया राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे. आणि त्या रकमेची भरपाई राज्यसरकारने करावी या मागणीसाठी इरिगेशन फेडरेशनच्यावतीने टाळेठोक आंदोलन केले जाणार आहे. त्यानुसार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व जिह्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयांना टाळे ठोकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने घेतला आहे. आंदोलनात सुमारे 10 हजार वीज ग्राहक सहभागी होणार असल्याची माहिती राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे लॉकडॉऊन करावे लागले. त्यामुळे कोणाच्याही हाताला काम मिळालेले नाही. सामान्य माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर लॉकडॉऊनमुळे देशात आर्थिक आाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक छोटे मोठे उद्योगधंदे बद पडले आहेत. त्यामुळे लोकांच्या हाताचा रोजगार बुडाल्यामुळे त्यांच्या रोजी राटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी कुटूंब प्रमूख म्हणून राज्य शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडॉऊन काळातील 300 युनिटस् पर्यंत वीज वापर असणाऱया वीज ग्राहकांची तीन महिन्यांची घरगुती वीज बिले राज्य शासनाने भरावीत अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्यावतीने राज्य शासनाकडे केली आहे. शेजारील केरळ, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यांनी लॉकडॉऊन काळातील घरगुती वीज बिलामध्ये सवलत दिलेली आहे .महाराष्ट्रातही वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. पण त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने अंतिम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील महावितरणच्या सर्व मुख्य जिल्हा कार्यालयांना ताळे ठोक आंदोलन केले जाणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.

Related Stories

कोल्हापूर : तुळशी धरणावर ‘तिरंगा’ रंगात विद्युत रोषणाई

Archana Banage

रंगकर्मींनी मांडला कलेचा बाजार

Archana Banage

Kolhapur; मंत्री मुश्रीफ यांनी शाहूनगर वसाहती मधील लोकांना बेघर केले- समरजितसिंह घाटगे

Abhijeet Khandekar

बिद्री कारखाना ३०५६ रुपये एकरक्कमी एफआरपी

Archana Banage

कबनूर ओढ्यातील मासे मृतावस्थेत; शाश्वत उपायांची आवश्यकता

Archana Banage

चोवीस वर्षे फरार आरोपीस अटक करण्यात शिरोळ पोलीसांना यश

Archana Banage