Tarun Bharat

कोल्हापूर : मातेला वाचवण्यासाठी ‘प्रसुती’ची १२ तास झुंज

सीपीआरमधील प्रसुती विभागातील कोरोना योद्धय़ांच्या अविरत प्रयत्नांना यश,
6 बाटल्या रक्त, रक्तघटकांचा वापर,
कोरोना पॉझिटिव्ह मातेसह बाळ सुखरूप

प्रतिनिधी / कोल्हापूर

मृत्यूच्या अग्निदिव्यातूनच मातृत्व सुख मिळते, त्यासाठी प्रसुतीच्या अग्निदिव्यातून तिला जावे लागते, अशाच अग्निदिव्यातून सीपीआरमध्ये एका मातेला पुर्नजन्म मिळाला, कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने मध्यरात्री येथील प्रसुती विभागात आली. ऑपरेशन थिएटरमध्ये नेताच तिने बाळाला जन्म दिला, प्रसुती झाली, पण मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली अन् त्यानंतर 12 तास तिचा मृत्य़ूशी अन् कोरोना योद्धे, वैद्यकीय स्टाफचा तिचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरू राहिला. कोरोना योद्धय़ांच्या अथक परिश्रमाला यश आले त्यासाठी 6 बाटल्या रक्ताचा वापर झाला. कोरोना योद्धय़ांनी देहभान विसरून केलेल्या प्रयत्नांनी एका मातेला पुर्नजन्म मिळाला..

जिल्हय़ातील ही विवाहिता मुंबईची आहे. तिचे सासर, माहेर जिल्हय़ात आहे. चार महिन्यांची ही गर्भवती लॉकडाऊनमध्ये माहेरी आली, अंतीम टप्प्यात ती कोरोना पॉझिटिव्ह होती, मंगळवारी सायंकाळी तिला त्रास सुरू झाला, अन् रात्री 12 च्या सुमारास ती थेट सीपीआरच्या प्रसुती विभागात दाखल झाली. ती आली तेव्हा तिच्या पायाला सुज होती, रक्तदाब वाढला होता, ऑपरेशन थिएटरमध्ये नेताच तिची प्रसुती झाली, अन् त्यानंतर तिचा जगण्यासाठी अन् डॉक्टरांचा तिला वाचवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. प्रसुतीनंतर मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तासाभरात तिची प्रकृती चिंताजनक बनली. अन् सीपीआरच्या प्रसुती विभागातील डॉक्टर्स, भुलतज्ञ, वैद्यकीय स्टाफचे अविरत प्रयत्न सुरू झाले.

आजरा तालुक्यातील माहेर अन् चंदगड तालुक्यातील सासर असलेली ही विवाहिता नोकरीनिमित्त मुंबईला होती. चार महिन्यांची ही गर्भवती लॉकडाऊनमध्ये माहेरी आली, अंतीम टप्प्यात तिला कोरोनाचा संसर्ग झाला, तिला रक्तदाबाचा त्रास होता.. मंगळवारी कुटुंबियांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेले, तेथे तिची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यामुळे स्थानिक हॉस्पिटल, कोरोना सेंटरनी तिला सीपीआरमध्ये नेण्याचा सल्ला दिला. आजरा येथून ती रात्री 12 च्या सुमारास सीपीआरमध्ये आली, प्रसुती विभागात नेतानाच तिच्या गर्भाशयाचे मुख पूर्णपणे उघडले होते, तिच्या पायाला सुज होती, अन् रक्तदाब वाढला होता, ऑपरेशन थिएटरमध्ये नेताच मध्यरात्री एकच्या सुमारास तिची प्रसुती झाली, बाळ सुखरूप होते, पण अतिरक्तस्रावाने तिची प्रकृती चिंताजनक बनली. स्त्रीरोगतज्ञ डॉ. जोत्स्ना देशमुख यांनी रूग्णाची स्थिती पाहून तातडीने भुलतज्ञांना बोलावले, रक्त, रक्तघटकांची रक्तपेढीकडून उपलब्धता केली. त्यानंतर तिचा जगण्यासाठी अन् वैद्यकीय स्टाफचा तिला पुर्नजन्म देण्यासाठी पुढील 12 तास संघर्ष सुरू राहिला.

सीपीआरमध्ये मध्यरात्री दीड वाजल्यापासून प्रसुती विभागप्रमुख डॉ. शानभाग यांच्या नेतृत्वाखाली डॉ. जोत्स्ना देशमुख, डॉ. योगेश कांबळे, भुलतज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. अधिक काळे, डॉ. हरीश कुमार, डॉ. समीर धनुमाळी अन् वैद्यकीय स्टाफचे प्रयत्न सुरू झाले. तिला व्हेंटिलेटरची गरज होती, सुदैवाने एनआयव्हीचा वापर केला, अन् दुपारी 1 वाजेपर्यत 6 बाटल्या रक्त, रक्तघटक तिला देत तिचा जीव वाचवण्यात सीपीआरमधील कोरोना योद्धय़ांना यश आले.

दरम्यान, मातेची प्रकृती स्थिर होईपर्यत वैद्यकीय पथक 12 तास देहभान विसरून तेथेच थांबून राहिले, सीपीआरमधील या कोरोना योद्धय़ांना तिचा जीव वाचवल्याचे समाधान वाटले, यापेक्षा ती कोरोना पॉझिटिव्ह असूनही नियमित प्रसुतीप्रमाणे तिच्यावर उपचार केल्याचे समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया डॉ. जोत्स्ना देशमुख यांनी व्यक्त केली.

याच दिवशी तीन महिने पूर्ण झालेली कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती उपचारार्थ प्रसुती विभागात आली, तपासणीत तिची स्त्रीबिजे मोठी झाल्याचे दिसून आले. तेथे गाठ होती तिला पीळ पडला होता. त्यामुळे तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली. त्यामुळे भविष्यात तिच्या प्रसुतीत येणारा धोका कमी झाला आहे, अशी माहिती डॉ. जोत्स्ना देशमुख यांनी दिली.

Related Stories

आजपर्यंत ६४ पोलीस होमक्वारंटाईन- डॉ. अभिनव देशमुख

Archana Banage

Kolhapur : लाल बावटा संघटनेकडून खोटे आरोप; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचा खुलासा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : मोफत धान्य वाटपाचा मोबदला या महिन्यात मिळणार

Archana Banage

कोल्हापूरची टेबल-टेनिसस्टार वैष्णवीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Abhijeet Khandekar

उञे गावचे वीज खांब पाण्याखाली ; नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

Archana Banage

काशीळ येथे दोन एसटीचा अपघात

Archana Banage