प्रतिनिधी / शाहुवाडी
आणि सुभाष चौकातील मामाच्या भेळची चव नियतीने घेतली आपल्या कवेत कोविंड सेंटर मध्ये घेतला अखेरचा श्वास शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथील सुभाष चौकात भेळवाले मामा म्हणून प्रसिद्ध असलेले पांडुरंग कोळेकर यांचे अकाली निधन झाले आणि मलकापूर पंचक्रोशीत प्रसिध्द असलेले भेळ वालेमामा अनंतात विलीन झाले मलकापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार
मलकापूर शहरातील सुभाष चौकात गेले तीस वर्ष झाले सुखी, ओलि भेळ देवून अनेकांच्या जीभेवर आंबट गोड चव देणारे पांडूरंग कोळेकर उर्फ भेळ वाले मामा आपल्या जीवनरूपी प्रवासात मात्र नियतीच्या चक्रव्यूहात अडकले आणि अनंतात विलीन झाले लहानापासून थोरापर्यंत जिभेला आंबट- गोड चव देणाऱ्या मामांच्या कुटुंबीयांना मात्र कोरोनाच्या भीषण वेदनेच्या दुःखद विरहातच अखेरचा निरोप देण्याची वेळ आली.
दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आणि गेले तीस वर्ष कपाळावर केसरी गंध, मुखामध्ये हरिनाम, आणि बोलण्यात गोडवा, असणारे भेळवाले मामानी अखेरचा श्वास घेतला या बद्दल सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे.


previous post
next post