Tarun Bharat

कोल्हापूर : मुक्तसैनिक वसाहतीमध्ये घरफोडी

33 हजाराचे सोन्याचे दागिने लंपास

प्रतिनिधी / कोल्हापूर

मुक्तसैनिक वसाहत परिसरातील लक्ष्मीनारायण नगर येथे घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा 33 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. शशिकांत निवृत्ती मोरे (वय 54 रा. मुक्तसैनिक वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शशिकांत मोरे हे 12 सप्टेंबर रोजी कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरटÎाने त्यांच्या घराचे कुलुप तोडून चोरी केली. घरातील सोन्याची अंगठी, सोन्याचे टॉप्स आणि रोख 1500 रुपये असा 33 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस नाईक कोळी तपास करत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : किल्ल्यांवर पहारा देण्यासाठी मावळे सज्ज

Archana Banage

बेकरीच्या काऊंटरमधून रोकड लंपास

Archana Banage

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी वापरलेले साहित्य रस्त्यावर, हातकणंगलेजवळील प्रकाराने संताप

Archana Banage

उजळाईवाडीतील हॉस्पिटलने बिलासाठी १४ तास बॉडी अडविली

Archana Banage

जि.प.मध्ये घबराट,महिला कर्मचाऱयाचा पती कोरोना पॉझिटीव्ह

Archana Banage

नानीबाई चिखली, हमीदवाड्य़ातील भूखंडधारकांना मिळणार मालकीपत्रे

Archana Banage