Tarun Bharat

कोल्हापूर : मोफत धान्य वाटपाचा मोबदला या महिन्यात मिळणार

प्रवीण देसाई / कोल्हापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत धान्य वाटप करणाया रेशन दुकानदारांसाठी खुशखबर आहे. त्यांना एप्रिल ते मे महिन्यातील धान्य वाटपाचा मोबदला (कमिशन) या महिन्यात मिळणार आहे. ही रक्कम जिल्हा पुरवठा कार्यालयाला प्राप्त झाली असून ती थेट दुकानदाराच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे पैसे मिळाले नव्हते, यासाठी रेशन दुकानदार संघटनेकडून पाठपुरावा सुरु होता.

केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली. त्यानंतर त्याचे रेशन दुकानदारांकडून वाटपही सुरु झाले. परंतु या वाटपाच्या कामासाठी ठरलेला एका किलोमागे दीड रुपयांप्रमाणे मोबदला (वाटप कमिशन) चार महिने उलटले तरी मिळाला नव्हता. या मोबदल्याची रक्कम केंद्र सरकारने पन्नास टक्के व राज्य सरकारने पन्नास टक्के या प्रमाणात देण्याचे ठरले होते. यासाठी रेशन दुकानदार संघटनेच्या माध्यमातून शासन पातळीवर पाठपुरावा सुरु होता. त्या पार्श्वभूमीवर दुकानदारांसाठी आनंदाचे वृत्त आहे.

एप्रिल ते जून या महिन्यातील मोफत धान्य वाटपाचे पैसे जिल्हा पुरवठा कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. ते या महिन्यातच थेट दुकानदारांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. यासाठी पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांच्या बँक खात्यासह त्यांनी ऑनलाइनद्वारे किती धान्य वाटप केले, यासह अन्य आवश्यक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन दुकानदारांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. मोफत धान्य योजनेतून रेशन कार्डधारकांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप सुरु आहे. गेल्या चार महिन्यांपासून या मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या दुकानदारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

मोबदल्याची पैसे पुरवठा विभागाला प्राप्त : दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर
मोफत धान्य वाटपाचे एप्रिल ते जून महिन्याचे वाटप कमिशनचे पैसे जिल्हा पुरवठा कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. या महिन्यातच ते थेट रेशन दुकानदारांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.

Related Stories

कोल्हापूर : तिळवणीत एका युवकास कोरोनाची लागण

Archana Banage

कोल्हापूर : ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण कमी,समूह संसर्गात वाढ

Archana Banage

गिरगावात जिल्ह्याबाहेरुन आलेल्यांना गृह अलगीकरणात ठेवणार

Archana Banage

कोल्हापूर विभागाचे 2535 कोटी विक्रमी जीएसटी संकलन

Abhijeet Khandekar

‘आरोग्य’ कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा; ‘हिट स्ट्रोक’बाबत जनजागृती करण्याचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांचे आदेश

Abhijeet Khandekar

फिंगर प्रिंट एक्स्पर्ट परिक्षेत प्रियांका संकपाळ देशात पहिल्या

Archana Banage