Tarun Bharat

कोल्हापूर : यावर्षीची राखी कोरोना योद्ध्यांसाठी

Advertisements

बचत गट व सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी कोरोना योद्ध्यांना राखी बांधवी – नगरसेविका प्राजक्ता पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी / कुरुंदवाड

संपूर्ण जगभरात गेली चार महिने कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे वैद्यकीय, पोलिस, नगरपालिका क्षेत्रातील अधिकारी – कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना जीवदान मिळाल्याने अनेक आया – बहिणींच्या कपाळाचे कुंकू त्यांनी वाचविले आहे. त्या कोरोना योद्ध्यांना रक्षाबंधन सणाला आपल्या बहिणीकडे जाता येत नसल्याने शहर व गावागावातील बचत गट व सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी रुपी बंधन बांधावे असे आवाहन येथील नगर परिषदेच्या नगरसेविका प्राजक्ता प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे.

श्रावण पोर्णिमेला येणाऱ्या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला या सणाच्या निमित्ताने प्रेमाचे नाते दृढ करणारे बंधन रुपी राखी बांधते आपल्या भावनिक, मानसिक, आर्थिक संरक्षण मिळावे ही त्यामागची भावना आहे.

नगरसेविका प्राजक्ता पाटील

येत्या सोमवारी रक्षाबंधन हा सण येत आहे. कोरोनामुळे शहर व परिसरातील वैद्यकीय, पोलीस, नगरपालिका क्षेत्रातील अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनानिमित्त अहोरात्र सेवा बजावीत आहेत. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना त्यांनी जीवदान दिल्यामुळे अनेक आया बहिणीच्या कपाळाचे कुंकू त्यांनी वाचविले आहे त्या कोरोना योद्ध्यांना रक्षाबंधन सणानिमित्त ते आपल्या लाडक्या बहिणीच्या गावी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शहरातील व गावातील महिला बचत गट व सामाजिक महिला कार्यकर्त्या यांनी पोलीस, वैद्यकीय व महापालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना राखी बांधावी असे आवाहन येथील नगर परिषदेच्या नगरसेविका प्राजक्ता प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे.

Related Stories

अडुरे येथील नादुरुस्त रोहित्र बदलले; कृषीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

Rohan_P

जिह्यातील दोन टोळ्यातील सहाजण तडीपार

Patil_p

जिल्हा पुन्हा एकदा ‘लॉक’

Patil_p

सोमवारपासून हॉटेल्स होणार सुरू

Abhijeet Shinde

जिल्हा बँकेचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण यांचे अपघाती निधन

tarunbharat
error: Content is protected !!