Tarun Bharat

कोल्हापूर : ‘या’ मंडळाने पंचगंगा वैकुंठधामला दहा हजार शेनी केल्या दान

कसबा बावडा / प्रतिनिधी

कोल्हापूर शहरामध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेनींचा तुटवडा भासत असल्या बद्दल दोनच दिवसापूर्वी माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. कसबा बावडा येथील सुवर्ण महोत्सवी विजय स्वतंत्र तरुण मंडळाने शुक्रवारी पंचगंगा वैकुंठधाम कसबा बावडा येथे दहा हजार शेनी देऊन पथदर्शी उपक्रम राबवला.

पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर, पंचगंगा वैकुंठधाम कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमीत एक मे पासून सव्वीस ऑगस्ट पर्यंत सुमारे बावीसशेहे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या शेनींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुद्रित माध्यमे त्याचबरोबर समाज माध्यमावर याबाबत चर्चा होत असताना सुवर्ण महोत्सवी विजय स्वतंत्र तरुण मंडळाने शुक्रवारी दुपारी पंचगंगा वैकुंठधाम कसबा बावडा येथे दहा हजार शेनी दान केल्या.

यावर्षी या मंडळाचा सुवर्णमहोत्सव मंडळाने एप्रिल महिन्यात सेवा रुग्णालयामध्ये ५१ हजार रुपयांची बैठक व्यवस्था दान केली आहे. शुक्रवारच्या उपक्रमा वेळी रोहित सालपे, आकाश माने, प्रल्हाद कदम, प्रमोद चव्हाण, निलेश पाटील, सार्थक पाटील, विजय गोडसे महेश कदम आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

जिल्हा बंदीची कडक अंमलबजावणी करा

Patil_p

सातारा जिल्ह्यातील इच्छुक म्हणू लागलेत ‘मला बी आमदार झाल्यासारख वाटतंय’…

Archana Banage

‘निपाह’ संदर्भातील शास्त्रज्ञांच्या दाव्याची सत्यता पडताळा

datta jadhav

सातारा झाला 71 व्या प्रजासत्ताक दिनासाठी सज्ज

Patil_p

सातारा : 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Archana Banage

…तर राजकीय, सामाजिक जीवनातून संन्यास घेईन

datta jadhav