Tarun Bharat

कोल्हापूर : राजापूरच्या वृद्धावर कोल्हापुरात दफनविधी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनामुळे मृत झालेल्या राजापूर येथील एका वृद्धावर येथील बागल चौक कब्रस्तानामध्ये दफनविधी करण्यात आला. दोन तीन दिवसांपूर्वी राजापूर एक वृद्ध गृहस्थ उपचारासाठी कोल्हापुरात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही आला होता. उपचार सुरू असताना दोघांचेही स्वॉब घेण्यात आले. वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यान, उपचार सुरू असताना वृद्धाचे सीपीआरमध्ये निधन झाले.

वृद्ध व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचा दफनविधी करण्याचा प्रश्न निर्माण झाला. राजापूरच्या आमदार हुस्नबानू खलिफे, नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी स्थानिक नगरसेवक व प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफिक मुल्लाणी यांच्याशी संपर्क करून रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची विनंती केली. पण कोरोनामुळे कोणीही तयार झाले नाही. त्याचबरोबर प्रवासाच्या परवानगीबाबतही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मृत वृद्धाच्या मुलानेही प्रयत्न केले. त्यालाही यश आले नाही. अखेर प्रशासनाने बागल चौकातील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मृतदेह कब्रस्तानमध्ये आणण्यात आला. पण त्यावेळी काही नागरिकांनी विरोध केला. त्यावेळी त्यांची समजूत काढत सामंजस्यांनी भूमिका घेत दफनविधी पार पाडला.

जनाजा नमाज राजू नदाफ, नगसेवक तौफिक मुल्लाणी, जाफर मलबारी, जाफर महात यांनी अदा केली. दफनविधीवेळी महापालिका कर्मचारी, कार्यकर्त्यांनी पीपीई कीट परिधान केले होते. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक कटकधोंड, बंटी सावंत, अमित चौगुले यांचे सहकार्य लाभले. इचलकरंजीतील एका कोरोनाने मृत झालेल्या वृद्धावर दफनविधी करण्यात आला. दोन्ही वृद्धांवर शुक्रवारीच दफनविधी झाला हा योगायोग ठरला. दरम्यान, वृद्धाच्या नातेवाईकांसह मुलाने कोल्हापूरकरांचे आभार मानले.

Related Stories

तुळशी प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करा

Archana Banage

मराठी चित्रपट अनुदानाच्या प्रतिक्षेत; 250 पैकी 50 चित्रपटांचे परीक्षण

Archana Banage

ajit pawar:जे नेते बोलतायेत,तेच होतंय, परब यांच्या कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Rahul Gadkar

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊनला 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

Archana Banage

Kolhapur : स्कार्फ गिरणीत अडकून महिलेचा मृत्यू; धामोड येथील घटना

Archana Banage

सकल हिंदू समाज उतरला रस्त्यावर

Patil_p