Tarun Bharat

कोल्हापूर : राज्य शुटींग बॉल निवड चाचणी स्पर्धा अतिग्रे येथे 29 ते 31 जानेवारी

जयसिंगपूर / प्रतिनिधी

राज्य शूटिंग बॉल असोसिएशन च्या मान्यतेने ,कोल्हापूर जिल्हा शहरी व ग्रामीण शूटिंग बॉल असोसिएशनच्या वतीने राज्य शूटिंग बॉल निवड स्पर्धा 29, 30, 31 जानेवारी रोजी संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे येथे होत आहेत .या स्पर्धेमध्ये जे खेळाडू चांगले खेळतील त्यांची निवड गाजियाबाद येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे .त्याचबरोबर यावेळी कोच व मॅनेजर यांची ही निवड केली जाणार असल्याची माहिती शुटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर यांनी दिली.

या स्पर्धा 17, 19, 25 वर्षे मुले व मुली वयोगटात होणार आहेत .या स्पर्धेसाठी राज्यातील जिल्हा संघ मुले आणि मुली सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी तीनशे खेळाडू सहभागी होत आहेत .खेळाडूंच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून महाराष्ट्रातील नामवंत पंच व पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत .या स्पर्धा राजेंद्र नांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली होत असून उद्योगपती संजय घोडावत व घोडावत विद्यापीठाचे सीईओ विनायक भोसले यांचे सहकार्य लाभत आहे यावेळी आर वाय पाटील ,राजेंद्र झेले, राजेश झंवर, अभिजित कोंडे, राजू नरदे, विशाल लिंगाडे,सदाशिव माने ,पापा मालू आदी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर :`रेमडेसीवीर’ची प्रतिक्षा, प्रशासनाचा पाठपुरावा

Archana Banage

कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांना मातृशोक

Archana Banage

खुल्या, ओबीसींवर अन्याय करणारा निर्णय मागे घ्या

Archana Banage

कुरुंदवाडच्या क्रीडाक्षेत्रात एक मानाचा तुरा.

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘अनलॉक’ ची नियमावली जाहीर

Archana Banage

अभ्यासक्रम अपूर्ण असताना परीक्षा घेणार कशी ?

Archana Banage