Tarun Bharat

कोल्हापूर : राधानगरीत सर्वाधिक तर शाहूवाडीत सर्वात कमी लसीकरण

शाहूवाडीत प्रतिबंधक लसीकरण 13 टक्के, जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी


कोल्हापूर / कृष्णात पुरेकर

जिल्ह्यात 16 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली, सध्या व्याधीग्रस्त, ज्येष्ठांना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. लसिकरणाला प्रतिसाद वाढत आहे. पण जिल्ह्यात तील लसीकरणाची टक्केवारी 60 टक्क्यांच्या आसपास आहे. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक तर शाहूवाडी तालुक्यात सर्वात कमी 13 टक्के लसीकरण झाले आहे. कमी टक्केवारीच्या तालुक्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी शाहूवाडीतील लसीकरण केंद्रांना अचानक भेट दिल्याने यंत्रणा हादरली आहे.

आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली, दुसऱया टप्प्यात पोलीस, होमगार्ड, महसूल कर्मचारी आले. 1 मार्चला लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला, त्यामध्ये 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लसीकरण करण्यात येत आहे. आरोग्यसेवक, प्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोसही सुरू झाला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या 11 वरून 51 वर पोहोचली आहेत. आता जीवनदायी योजनेतील समाविष्ट खासगी हॉस्पिटल्समध्येही कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये 250 रूपयांत लसीकरण केले जात आहे.

कोरोना लसीकरणाचे प्रति केंद्र 100 चे उद्दिष्ट आहे. काही ठिकाणी उद्दिष्टांपेक्षा अधिक लसीकरण होत आहे. तर काही ठिकाणी ते 50 टक्क्यांखाली आहे. बुधवारी 463 आरोग्यसेवकांनी पहिला तर 709 जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यत एकूण 30 हजार 606 जणांनी पहिला तर 9 हजार 174 जणांनी जणांनी दुसरा डोस घेतला आहे. प्रंटलाईन वर्कर्सपैकी 854 जणांनी पहिला तर 256 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आजपर्यत 13 हजार 420 जणांनी पहिला तर 534 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. बुधवारी 1 हजार 416 व्याधीग्रस्तांती तर 7 हजार 955 ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला. गेल्या 10 दिवसांत 4 हजार 661 व्याधीग्रस्तांनी तर 26 हजार 816 ज्येष्ठ नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे. दीड महिन्यांत जिल्ह्यात त 75 हजार 480 जणांनी पहिला तर 9 हजार 710 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाची टक्केवारी साठपर्यंत आहे.

कोरोना लसीकरणात राधानगरी तालुक्याची टक्केवारी सर्वाधिक आहे तर शाहूवाडी तालुक्याची 13 टक्के असून ती सर्वात कमी टक्केवारी आहे. जिल्हाधिकाऱयांनी बुधवारी शाहूवाडी तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी लसीकरणाचा आढावा घेतला, तसेच कमी टक्केवारीसंदर्भात माहिती घेत लसीकरण वाढवण्याच्या सुचना केल्या. तालुक्यात लसीकरण केंद्रे वाढवा, व्याधीग्रस्त, ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त लसीकरणात सामावून घ्या, अशी सुचनाही त्यांनी केल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

Related Stories

जगताप नगर परिसरात सशस्त्र हल्ला करून युवकाचा खून,परिसरात हळहळ

Archana Banage

आप्पाचीवाडी उड्डाणपुलाजवळ अपघातात कोल्हापुरातील दोन ठार

Archana Banage

कोल्हापूर : कुपलेवाडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Archana Banage

कोल्हापूर : राजेंद्रनगरातील महिलांच्या बल्लारी जुगार अडयावर छापा

Archana Banage

खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची मागणी

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगाव येथे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची गरज

Archana Banage
error: Content is protected !!