Tarun Bharat

कोल्हापूर : राशिवडेत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Advertisements

प्रतिनिधी / राशिवडे

येथील एका तीस वर्षीय युवकाचा आज सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या युवकाचा दोन दिवसांपूर्वी स्वॅब घेण्यात आला होता. आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सदर युवकास गेल्या आठ दिवसांपासून ताप होता. दोन दिवसापूर्वी राधानगरी येथील कोविड सेंटरमध्ये त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. सदर युवक होम क्वारंटाईन होता. त्याच्या संपर्कात कोणी आलेल नसून त्यास आज पुढील उपचारासाठी राधानगरी येथे दाखल करण्यात आले आहे. हा परिसर ग्रामपंचायतीकडून सील करण्यात आला आहे. तर नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच कृष्णात पोवार व उपसरपंच अनिल वाडकर यांनी केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : भारत सरकार पुरस्कृत अटल – २०२० शैक्षणिक मानांकनांत डीकेटीई अग्रेसर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : काळाम्मावाडी धरण ७६.४१ टक्के भरले, दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

Abhijeet Shinde

संजय धुमाळांवर विनयभंगाचा गुन्हा

Patil_p

सांगलीतील लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक निलंबित

Abhijeet Khandekar

धामणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यु

Sumit Tambekar

खाटांगळेत रेशन धान्य वाटपात भ्रष्टाचार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!