Tarun Bharat

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरील नो एंट्री’चा ताण सीपीआर’ वर..!

4 तासांत सीपीआरमध्ये 70 जणांची तपासणी

प्रतिनिधी / कोल्हापूर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील वाहनांना `टेस्टींगविना नो एंट्री’ सुरू केली आहे. त्यामुळे सोमवारी कोरोना तपासणीसाठी वाहनधारकांनी येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यत कोरोना बाह्यरूग्ण विभागात 3 तासांत 70 जणांची तपासणी केली. राष्ट्रीय महामार्गावरून टेस्टींगची येणाऱयांची गर्दी वाढल्याने त्याचा ताण सीपीआरच्या वैद्यकीय पथकावर आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अन्य जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनतेला लॉकडाऊनसाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या अद्यापी नियंत्रणात आहे. शहरात सरासरी 8 ते 10 रूग्ण प्रतिदिन नवे येत आहेत. सीपीआर हॉस्पिटल, आयसोलेंशन हॉस्पिटल, इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल आणि गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोनाची तपासणी केली जात आहे. या सर्व ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचारही केले जात आहेत. तेथे स्वतंत्र बाह्यरूग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग आहे. पण संशयित, कोरोना रूग्णांचा सर्वाधिक ताण हा जिल्हा रूग्णालय असलेल्या सीपीआर हॉस्पिटलवर येत आहे.

राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात परजिल्ह्यातन येणाऱयांच्या तपासणीसाठी नाकाबंदी सुरू केली आहे. नाक्यांवर वाहन तपासणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी येथे टोल नाक्यावर कर्नाटक पोलीस आणि कोल्हापूर पोलीस वाहनांची तपासणी करत आहे. कर्नाटक पोलिसांनी टेस्टिंगशिवाय कर्नाटकमध्ये नो एंंट्री अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात निघालेल्या वाहनधारकांची सोमवारी कोंडी झाली. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी काही वाहनांसाठी प्रवाशांनी वाहनासह सीपीआर गाठले. त्यामुळे सीपीआरच्या कोरोना बाहÎ रूग्ण तपासणी वॉर्डसमोर मोठी रांग लागली.

टोलनाक्यांवर नो एंट्रीमुळे सीपीआरमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यत 70 जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वाची कोरोना तपासणी करण्यात आली. कागल येथील ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पण तरीही वाहनधारकांनी कोरोना टेस्टसाठी सीपीआर गाठले. त्यामुळे सीपीआरमध्ये कोरोना तपासणीसाठी कोरोना ओपीडी सेंटरवर गर्दी झाली. आलेल्यांपैकी लक्षणे असलेल्यांची रॅपीड अँटीजेन टेस्ट केल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.

Related Stories

कोल्हापूर : गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी महेश कोरी

Archana Banage

मुलीचा लैंगीक छळ करणार्‍या बापाला पाच वर्ष सक्तमजुरी

Abhijeet Khandekar

जोतिबावर भाविकांची अलोट गर्दी

Archana Banage

Constitution Day; संविधान दिनानिमित्त उद्या कोल्हापुरात रॅली

Abhijeet Khandekar

कोल्हापूरातील उमेदपूरीत -कनाननगर रस्त्यावर चेन स्नॅचिंग

Archana Banage

वैद्यकीयची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करा

Archana Banage
error: Content is protected !!