Tarun Bharat

कोल्हापूर : रासायनिक खतांच्या किंमती कमी करा : खासदार धैर्यशील माने

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या काळात रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सदर रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी पत्राद्वारे रासायनिक आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडाजी यांचेकडे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे, रासायनिक खतांच्या किमंतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झालेली आहे. गेल्या दिड वर्षापासून शेतीची कामे जरी सुरु असली तरी बाजारपेठा बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे.

सध्याची रासायनिक खतांच्या किमंतीची वाढ ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. खताच्या किमंती वाढु लागल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांचे दर वाढत असल्याने उत्पादन खर्च अधिक होणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर आता खतांचे दर वाढल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. तरी सदर खतांचे दर कमी करुन कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.

Related Stories

गडमुडशिंगीत तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जण ताब्यात

Abhijeet Khandekar

राजाराम कारखान्याच्या 1346 सभासदांना ‘सर्वोच्च’ दिलासा

Abhijeet Khandekar

वादळी पावसाने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे त्वरित पूर्ण करा : आ . पी.एन.पाटील

Archana Banage

Kolhapur : शेतकऱ्यांसह उद्योगांनाही जिल्हा बँकेचे पाठबळ

Abhijeet Khandekar

ग्रामपंचायत उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादा वाढवल्या

Kalyani Amanagi

गणेशोत्सवाचे निर्देश जाहीर, पण मोहरमचे काय

Archana Banage