Tarun Bharat

कोल्हापूर : रिक्षा चालकांच्या अनुदानासाठी नोंदणी सुरू

Advertisements

आमदार चंद्रकांत जाधव यांचा पुढाकार
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अर्ज करण्याची सुविधा सुरू, नोंदणी झालेल्यांना प्रमाणपत्राचे वाटप

प्रतिनिधी / कोल्हापूर

रिक्षा चालकाना देण्यात येणाऱया 1500 रूपयांच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आमदार चंद्रकांत जाधव यांनी खासबाग येथील कार्यालयात केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सोमवारी या सुविधेला सुरवात झाली. नोंदणी पूर्ण झालेल्यांना प्रमाणपत्राचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांचीं उपस्थिती होती.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यशासनाने कडक संचारबंदी लागू केली. यामध्ये फेरीवाले, रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना 1500 रूपये अनुदान देण्यात येत आहे. कोल्हापुरातील 15 हजार रिक्षा चालकांना अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. रिक्षा चालकांच्या सोयीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी अर्ज करण्याची सुविधा मंगळवार पेठ, खासबाग येथील कार्यालयामध्ये केली आहे. या सुविधेचे उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले. 15 रिक्षा चालकांना नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील 450 हून अधिक रिक्षा व्यावसायिकांना अर्ज केले आहेत. आजरा, चंदगड, शाहुवाडी येथूनही फोन येत आहेत. 55 जणांची नोंदणी झाली आहे. आरटीओ विभागाकडून अर्जाची पडताळणी होऊन तात्काळ त्यांच्या खात्यावर 1500 रूपये जमा होणार आहेत. अनुदानासाठी जास्तीत जास्त रिक्षा चालकांनी कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन अर्ज करून घ्यावेत.

आमदार चंद्रकांत जाधव

Related Stories

शियेमार्गे चौपदरीकरणाला विरोध

Archana Banage

वीजयंत्रणा धोकादायक असल्यास द्या व्हॉटस् अॅपद्वारे माहिती

Archana Banage

पुणे पदवीधरसाठी रयत क्रांतीतून डॉ. चौगुले यांना उमेदवारी

Archana Banage

कोल्हापूर : कुंभोज येथे पाच दिवसाच्या ‘जनता कर्फ्यू’ला सुरुवात

Archana Banage

श्री.तात्यासाहेब कोरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध : आठ नव्या चेहऱ्यांना संधी

Abhijeet Khandekar

‘जिल्हा नियोजन’वर 20 जण नियुक्त

Archana Banage
error: Content is protected !!