Tarun Bharat

कोल्हापूर : लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, रक्तटंचाई टाळा !

Advertisements

जिल्हा ब्लड बँक असो. अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर यांचे आवाहन, लस घेतलेल्या व्यक्तीस दोन महिने करता येणार नाही रक्तदान

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापुर्वी रक्तदान करा व तीव्र रक्तटंचाई टाळावी, असे आवाहन प्रकाश घुंगूरकर (अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन) यांनी केले आहे. लसीकरणापूर्वी रक्तदानाचे नियोजन होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील दोन महीने रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याची भिती घुंगूरकर यांनी व्यक्त केली आहे. 

 केंद्रीय रक्त संक्रमण परीषदेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानासंदर्भात मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली असून यामध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर 28 दिवस सदर व्यक्ती रक्तदान करु शकत नाही. कोरोना प्रतिबंधक लस प्रामुख्याने दोन टप्प्यात दिली जात आसून पहील्या लसीकरणानंतरचा दुसरा डोस 28 दिवसानी दिला जाणार आहे. या दुसऱया लसीकरणानंतर 28 दिवसाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतरच लस घेतलेली व्यक्ती रक्तदानास पात्र राहणार आहे.  त्यामुळे एकूण दोन महीने सदर व्यक्ती रक्तदान करु शकणार नाही.

यामध्ये लसीकरणाची मोहीम तीव्र होत असून सरकारने ठरवून दिलेल्या सुचनाप्रमाणे लसीकरण सुरु आसून लोकांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे लस घेतल्यास किमान दोन महीने रक्तदान करता येणार नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आसल्याने याचा परीणाम मोठ्या प्रमाणात रक्तटंचाईवर होणार आहे. अगोदरच तीव्र ऊन्हाळा, महाविद्यालये बंद, ग्रामीण भागातील लोक शेती कामात व्यस्त, अशा अनेक कारणांमुळे ऊन्हाळ्यात प्रतिवर्षी रक्तटंचाई निर्माण होत आसते. त्यातच आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे पुढील दोन महीने तीव्र रक्तटंचाई निर्माण होणार आसल्याने रक्तदानास पात्र आसणाऱया व्यक्तींनी लसीकरणापुर्वी रक्तदान करुन रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असेही घुंगूरकर यांनी आवाहन केले.

गरजू रुग्णांसाठी करा रक्तदान

रक्तटंचाई निर्माण झाल्यास बाळंतपण, विविध आपघात ,ऍनिमिया, थॅलेसमिया, डायलेसीस तसेच ह्य्दयरोग, कँन्सर या आजारामध्ये उपचारात रक्त व रक्तघटकाची तातडीची गरज भासत आसते. आशावेळी रक्तपेढ्यांमध्ये  रक्तसाठा आसणे गरजेचे आहे. अन्यथा याचा गंभीर परीणाम अरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो. म्हणून संभाव्य रक्तटंचाई टाळण्यासाठी रक्तदात्यानो लसीकरणापुर्वी रक्तदान करा. गरजू रूग्णांचे प्राण वाचवा असे आवाहनही घुंगूरकर यांनी केले.

Related Stories

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 348 वर

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी समाजाचा सेवक म्हणून शेवट पर्यंत लढणार : खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

आमदार पी एन पाटील यांचा राजीनामा संचालक मंडळाने फेटाळला

Abhijeet Shinde

भोगीनिमित्त घराघरात सुगडाचे पुजन

Sumit Tambekar

पन्हाळगडावरील चार दरवाज्याच्या पायथ्याची दरड खचली

Abhijeet Khandekar

महात्मा ज्योतिबा फुले जन योजना गोरगरीबांसाठी वरदान ठरणार – आरोग्य मंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!