प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात गेली पाच महिने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे नगरपालिकेचे कोविड योद्धाच कोरोनाच्या विळख्यात सापडले असून आज शहरात नव्याने १२ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष अडागळे यांनी सांगितले. तसेच कुर्डुवाडीसह माढा तालुक्यात भोसरे, रोपळे, दारफळ, वडशिंगे, मोडनिंब, तांबवे टे,दहिवली, माढा, कुर्डू, महिंसगाव याठिकाणी ही बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यात आज एकूण ३८ बाधित रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
माढा तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून आज भोसरे येथे १ तर रोपळे येथे २, दारफळ येथे १, वडशिंगे येथे ४, मोडनिंब येथे १, तांबवे टे येथे ६, दहिवली येथे ५, माढा येथे ३ ,कुर्डू येथे २ , महिंसगाव येथे १, असे एकूण ३८ रुग्ण रुग्ण कोरोना बाधित झाले असून त्यांचा राहता परिसर प्रतिबंधित करुन संपर्क यादी घेतली जात आहे. आज एकूण १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील आजपर्यंत बाधितांची संख्या ९०७ अशी झाली असून त्यापैकी ५३१ जण बरे होऊन घरी गेले असल्याचे अरोग्यविभागाकडून सांगण्यात आले आहे.


next post