Tarun Bharat

कोल्हापूर : वळीवडेत गावठी दारूसाठा जप्त; तरुणावर गुन्हा

वार्ताहर/उचगाव

लॉकडाऊन असतानाही वळीवडे (ता. करवीर) येथे विक्रीसाठी गावठी दारूचा साठा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. बंडू विठ्ठल मोहिते (वय ३०, सध्या रा. वळीवडे, मूळ रा. मिनचे सावर्डे, ता. हातकणंगले) असे या तरुणाचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून १२ हजार रुपयांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलीस नाईक आकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की बंडू मोहिते याने तीस लिटर गावठी दारू वळीवडे येथील अमर माने यांच्या घराच्या आडोशाला विक्रीसाठी साठा करून ठेवली. याबाबत गांधीनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मोहितेवर कारवाई केली. त्याच्याकडून १२ हजार रुपयांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

सातारा : संगममाहुलीत अंगणवाडी सेविकेचा सख्या भावाकडून खून

Archana Banage

कोल्हापूर : चंदूरसाठी कोविड सेंटरची गरज

Archana Banage

722 ग्रामपंचायतींचा फटाकेमुक्त दिवाळीचा ठराव

Archana Banage

कोगे नदीकाठी झाडावर अडकलेल्या वानरांना सुरक्षित स्थळी हालवण्यात यश

Archana Banage

राधानगरी धरण 75 टक्के भरले, 1425 क्युसेकने विसर्ग सुरु

Archana Banage

निवडणूक आयोग उगवता सूर्य आणि त्रिशूळ दोन्ही चिन्ह नाकारणार, ठाकरे आणि शिंदे यांना कोणते चिन्ह मिळणार?

Archana Banage