Tarun Bharat

कोल्हापूर : वाकरेत बिबट्यासदृश्य प्राण्याच्या दर्शनाने परिसरात घबराट

Advertisements

प्रतिनिधी/वाकरे

वाकरे (ता. करवीर) येथील शेतकरी पै. तानाजी पाटील आपल्या “कळवातीण” नावाच्या शेतात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास भात पीकाची कापणी करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्यासदृश्य प्राण्याने दर्शन झाले. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने हा प्राणी पळून गेला. यानंतर करवीर वनविभागाच्या वनरक्षक कोमल रहाटे यांनी त्वरित प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन या प्राण्याच्या पायाच्या ठशांची पाहणी केली. त्यांनी हे ठसे बिबट्या सदृश्य प्राणी आणि त्याच्या पिलाचे असल्याची शक्यता व्यक्त केली. दरम्यान या घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ माजली असून ऐन सुगीच्या दिवसात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गावातील शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून या परिसरात जाऊ नये अथवा जायचे असेल तर सुरक्षितपणे जावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी दक्षता सदस्य शरद काळे, विकास पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की पै.तानाजी पाटील व त्यांच्या पत्नी लता हे दोघेजण सकाळी कुरण परिसरातील “कळवातीण” नावाच्या शेतात भात कापणी करण्यासाठी जागा करण्यासाठी गेले होते. भात कापणी करीत असताना त्यांच्या पत्नीला शेतात सळसळ जाणवली. त्यांनी पाहिले असता एक बिबट्या सदृश्य प्राणी आणि त्याचे पिल्लू त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केला असता हा प्राणी शेतातून पळून गेला. पाटील यांनी याची माहिती कोतवाल बाजीराव कांबळे यांना दिली. कांबळे यांनी करवीर वन विभागाला या संदर्भात माहिती दिली. यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी हे ठसे बिबट्या सदृश्य प्राणी आणि त्याच्या पिलाचे असल्याची शक्यता व्यक्त केली.

Related Stories

शाहूपुरी पोलिसांकडून मोबाईल, दुचाकी चोरटयांची टोळी अटक

Abhijeet Shinde

शाहूवाडी येथे थांबलेल्या ट्रकवर मोटार सायकल आदळली, जखमीचा मृत्यू

Abhijeet Shinde

अन्यायकारक वीज तोडणी भाजपचे कार्यकर्ते रोखणार

Abhijeet Shinde

ऊस ट्रॅक्टर दुचाकी अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणप्रश्नी सर्वांनी एकत्र यावे

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात २२१९ नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!