Tarun Bharat

कोल्हापूर :वाचनालयाला अर्थसाह्य करण्यासाठी प्रयत्न करणार : अशोकराव माने

Advertisements

शिरोळ / प्रतिनिधी

गाव तिथं वाचनालय ही संकल्पना पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी राबवण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी केला परंतु शासनाचे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने अनेक वाचनालयाची दुरवस्था झाली आहे 15 व्या वित्त आयोगातून वाचनालयाला अर्थसाह्य करण्यासाठी आपण खास प्रयत्न करू अशी ग्वाही डॉ. अशोकराव माने यांनी दिली.

येथील राजश्री शाहू नगर वाचनालयाच्या सभागृहात शिरोळ तालुका ग्रंथालय  संघटनेच्यावतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शिरोळ तालुका ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष एम. एस. माने यांनी करून कर्मचाऱ्यांना दोन लाख विमा योजना लागू  करण्यात येणार आहे. अल्प मानधनावर कर्मचारी काम करत असून शासनाने भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.


या कार्यक्रमास  शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, जयसिंगपूर नगर परिषद वाचनालयाचे तारळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव माने देशमुख,  अश्रफ पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते‌. यावेळी शिरोळ तालुका ग्रंथालय संघटनेच्या अध्यक्षपदी एम. एस. माने यांची निवड झाल्याबद्दल संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, शेवटी आभार संचालक देशमुख यांनी मानले.

Related Stories

Special Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय

Kalyani Amanagi

सावित्री महिला औद्योगिक संस्था पॅकेजिंग क्लस्टर उभारणार : आमदार डॉ. विनय कोरे

Sumit Tambekar

लवकरच बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार

Sumit Tambekar

`बैतुलमाल’चा पुरग्रस्त ३ गावांना मदतरुपी आधार

Abhijeet Shinde

प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत फेरीवाल्यांना कर्ज

Abhijeet Shinde

गॅस सिलिंडरचे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!