Tarun Bharat

कोल्हापूर : वादळी पावसामुळे गांधीनगर येथे नुकसान

उचगाव / वार्ताहर

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे गांधीनगर ता.करवीर येथील दोन ठिकाणी झाडे कोसळून व तीन ठिकाणच्या इमारती वरील पत्र्याचे शेड उडाली. त्यामध्ये तीन मोटारसायकलसह एका चार चाकी चे मोठे नुकसान झाले.

गांधीनगर येथील गांधी पुतळा शेजारी वादळी पावसाने मोठे झाड रस्त्यावर कोसळले. हरे माधव मंदिर येथे ही झाड कोसळले. रस्त्यावर कोणीही नसताना ही झाडे कोसळल्याने जीवित हानी टळली . तसेच वळीवडे हद्दीत हुले मळा येथील कवरराम कॉलनी मध्ये मोठ्या तीन इमारती वरील पत्र्याची शेड वादळाने कोसळून इमारती खाली पार्किंग केलेल्या तीन दुचाकी व एका चार चाकी वर हे शेड पडल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

तसेच शेड चा काही भाग इमारतीच्या आजूबाजूला असणाऱ्या काचेच्या खिडक्यावर पडल्याने इमारतीचे ही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करत होते.

Related Stories

सोमवारपासून हॉटेल्स होणार सुरू

Archana Banage

कोल्हापूर : खुपिरे ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा

Archana Banage

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ राज्य सरकारच्या नजरकैदेत

Archana Banage

संभाजीराजेंना शिवसेनेने सन्मान दिला पाहिजे- चंद्रकांत पाटील

Kalyani Amanagi

गोकुळच्या कर्मचाऱ्यांना साडेनऊ कोटींची पगारवाढ

Archana Banage

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात समन्वयाचा अभाव

Archana Banage