Tarun Bharat

कोल्हापूर : वारणा समूहातील जेष्ठ कार्यकर्ते विष्णू बच्चे यांचे निधन

प्रतिनिधी / वारणानगर

येथील वारणा साखर कारखाना, वारणा बँक, वारणा दूध संघ अशा विविध संस्थात संचालक म्हणून तीस वर्ष काम केलेले वारणा समूहातील जेष्ठ कार्यकर्ते माजी संचालक विष्णू तातोबा बच्चे (पंत) वय ९२ रा. बच्चे सावार्डे ता. पन्हाळा यांचे आज मंगळवारी पहाटे दि.२१ रोजी वार्धक्याने दुःखद निधन झाले.

सहा दशकाच्या राजकीय कारकिर्दीत विष्णू बच्चे हे पंतआण्णा म्हणून वारणा परिसराला परिचीत होते,बच्चे सावर्डे गावातील शांत संयमी व कुशल राजकारणी नेतृत्व म्हणून त्याची ओळख होती. सावर्डे ग्रामपंचायतीचे २९ वर्ष सरपंच, नवजीवन सोसायटीचे चेअरमन, कामधेनु दूध संस्थेचे चेअरमन तसेच वारणा उद्योग समूहातील वारणा बँक संचालक दहा वर्षे, वारणा दूध संघ संचालक पंधरा वर्षे, वारणा साखर कारखाना संचालक पाच वर्ष अशी पदे भूषवत विष्णू बच्चे यानी सहा दशकातील कारकिर्दीवर यशस्वी मोहर उमटवली.

विष्णू बच्चे यांच्या पाश्चात पत्नी,दोन मुले, चार मुली, सुना नातवंडे असा परिवार असून त्यांचे रक्षाविसर्जन गुरुवारी दि.२३ रोजी सकाळी नऊ वाजता बच्चे सावर्डे येथे आहे.

Related Stories

कोल्हापूर : नृसिंहवाडी परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन

Archana Banage

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

Abhijeet Khandekar

राणा दाम्पत्यावर आरोपपत्र दाखल, पुढील सुनावणी १६ जूनला

Archana Banage

बनावट दागिने गहाण ठेवून सराफाची फसवणूक

Patil_p

कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी

Archana Banage

शिवसेना संपवण्याचा शरद पवारांचा प्लॅन; विजय शिवतारेंचा गंभीर आरोप

Archana Banage