Tarun Bharat

कोल्हापूर : वितरकांचा दूध विक्री बंदचा निर्णय मागे

जागेवरुन दूध विक्रीबाबत प्रशासनाची सहकार्याची भुमिका
गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी घेतली जिल्हधिकारी, पोलीस अधीक्षकांची भेट   

प्रतिनिधी / कोल्हापूर

जागेवरुन दूध विक्रीच्या मागणीबाबत प्रशासनाने सहकार्याची भुमिका घेतल्याने शहरातील दूध वितरकांनी बंदचा निर्णय मागे घेतला. गोकुळचे नुतन संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या अध्यक्षतेखाली दूध वितरक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी घरपोच दूध वितरणामध्ये येणाऱया अडचणी मांडल्या. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रशासनाने जागेवरुन दूध विक्रीबाबत सकारात्मक भुमिका घेणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये दूध विक्री जागेवरुन न करता ती घरापोच करण्याची अट घालण्यात आली. मात्र शहरात दररोज सुमारे पाऊणे दोन लाख लिटरहून अधिक दूधाची व्रिक्री होते.  इतके दूध पूर्णपणे घरपोच करणे अशक्य असल्याचे वितरकांमधून सांगण्यात येत होते. त्यामुळे जागेवरुन दूध विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी वितरकांमधून होत होती. 

लॉकडाऊन झाल्यापासून पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून जागेवरुन दूध विक्री करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. तसेच अरेरावीची भाषा ही केली जात होती. त्यामुळे दूध विक्रीतून उत्पन्न कमी आणि दंड जास्त अशी अवस्था वितरकांची झाली होती. तसेच अरेरावीमुळे होणार मनस्ताप वेगळा. यासर्व कारणांमुळे वितरकांनी गुरुवारपासून दूध विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात वितरकांनी गोकुळचे संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना कल्पना दिली. यावर डॉ. मिणचेकर यांनी दूध वितरक असोसिएशनच्या पदाधिकाऱयांसमवेत तातडीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून त्यांच्यासमोर सर्व परिस्थिती सविस्तर मांडली यावेळी प्रशासनाने जागेवरुन दूध विक्रीबाबत सहकार्य करण्याची भुमिका स्पष्ट केली.

यावेळी वितरक असोसिएशनचे अध्यक्ष सागर साळोखे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संचालक विजय परमाणे, निलेश पाटील, हेमंत पाटील, संकेत तावडे आदी उपस्थित होते. 

…तर शंभर नंबरला कॉल करा

 शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचीही भेट घेतली. त्यांनाही घरपोच दूध विक्रीमध्ये असणाऱया समस्या सांगितल्या. यावेळी बलकवडे यांनी जागेवरुन दूध विक्री करणाऱयांवर कारवाई न करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना सूचना करणार असल्याचे सांगितले. तसेच पोलीस कर्मचारी दंडात्मक कारवाई करण्यास आल्यास शंभर नंबरला कॉल करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी केले.   

केवळ दूध विक्री करावी

जागेवरुन दूध व्रिक्रीबाबत प्रशासनाने सहकार्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे आजपासून जागेवरुन दूध विक्री करता येणार आहे. तरीही दूध ऐवजी अन्य कोणतीही वस्तू विक्री करताना कोणावर कारवाई झाल्यास त्याची दखल गोकुळ व असोसिएशनकडून घेतली जाणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात केवळ दूध विक्री करुन प्रशासनास सहकार्य करावे.

– सागर साळोखे, अध्यक्ष दूध वितरक असोसिएशन

Related Stories

कोल्हापूर : बामणीत शॉर्टसर्किटमुळे प्रापंचिक साहित्य जळून खाक

Archana Banage

कारभाऱ्यांसह अनेक माजी पदाधिकारी झाले ‘आऊट’

Kalyani Amanagi

गुडे गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल

Archana Banage

शिवाजी विद्यापीठाची प्रगती नेत्रदीपक; डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे गौरवोद्गार

Abhijeet Khandekar

महावितरण अर्ज छाननी विरोधात सकल मराठा समाज आक्रमक

Archana Banage

खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कारावास

Abhijeet Khandekar