Tarun Bharat

कोल्हापूर विमानतळास भारत सरकारचा वाटर डायजेस्ट अवॉर्ड

Advertisements

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

उजळाईवाडी येथील कोल्हापूर विमानतळास भारत सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाकडून देण्यात येणारा वाटर डायजेस्ट अवॉर्ड 2020 देशातील सर्व विमानतळा पैकी कोल्हापूर विमान तळास प्राप्त झाला आहे .याबाबत केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात हे अवार्ड जाहीर झाले. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून विमानतळ परिसरात बाग फुलवण्याचे झाडे लावण्याचे काम विमानतळावर हिरवळ फुलवण्याचे काम प्रशासनाने केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया कम्युनिकेशन विभागाचे ऋतुराज भोसले एच आर विभागाचे डीएम शास्त्री यांच्यासहविमानतळ कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

हा पुरस्कार मिळवण्यासाठी कोल्हापूरकरांचा मोठा हात असून गार्डनची देखभाल संजय घोडावत ग्रुपकडून होत आहे. कोल्हापूर विमानतळ इंटरनॅशनल लेवल होण्यास वेळ लागणार नाही यामध्ये केंद्रशासित प्रदेश यांना सामावून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन यामध्ये सर्व संस्था व्यक्ती इंडस्ट्रीज यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते.

Related Stories

”रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलं काय?”

Abhijeet Shinde

चौकीतच रंगली ओली पार्टी; पोलिसांच्या अब्रूची लक्तरं वेशीवर

datta jadhav

भाजप- राष्ट्रवादीमध्येच होणार टस्सल?

Patil_p

भारतीयांनो सावधान! ऑस्ट्रियात संपूर्ण लॉकडाऊन

Sumit Tambekar

तो शाहू क्रीडा संकुलाच्या परिसरातील कचरा उचलला

Patil_p

दारू अड्डय़ावर छापा टाकणाऱया पोलिसांवर हल्ला

Patil_p
error: Content is protected !!