Tarun Bharat

कोल्हापूर : व्हनाळी येथे गवताच्या गंजीला आग; सुमारे तीन लाखाचे नुकसान

Advertisements

शासकीय अधिकारी गायब, तलाठ्यांना फोन उचलायला ही वेळ नाही
दहा गवत गंज्या जळाल्या : सुमारे तीन लाखाचे नुकसान

वार्ताहर / व्हनाळी

व्हनाळी तालुका कागल येथील गवत गंजीना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दहा गवत गंज्या जळाल्या यामध्ये सहा शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

व्हनाळी गावच्या दक्षिणेला असलेल्या अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दंडवते वसाहत परिसरात जनावरांच्या वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता म्हणून शेतकऱ्यांनी गवत पिंजराच्या गंज्या घातल्या होत्या. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या गवत गंजींना अचानक आग लागली. शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आग लागल्याचे पाहताच आरडाओरडा केला. शिवाय आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीने रुद्ररूप धारण केल्याने आग विझवण्या यश आले नाही. त्यानंतर कागल नगरपालिकेच्या अग्निशामक याविषयी माहिती देण्यात आली परंतु अग्निशामक दलाच्या येण्यापुर्वीच या गवताच्या गंजा पूर्णपणे जळालेल्या होत्या. गंजीतील पिंजर गवत जळाल्यामुळे जनावरांच्या पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या वाळल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

यामध्ये निवृत्ती कृष्णा दंडवते, सुरेश शिवराम दंडवते, शशिकांत शिवराम दंडवते, आनंदा शिवराम दंडवते, रवींद्र बळवंत पाटील, बाबासो शामराव आगळे आदी शेतकऱ्यांच्या गवत गंजी जळाल्याने त्यांचे सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. झाल्यानं नुकसानीचा शासकीय पंचनामा होऊन मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.

शासकीय यंत्रणाच ढिसाळ

व्हनाळी येथे झालेल्या या गवत गंजीच्या जळीताची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करण्याच्या अपेक्षेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठी दिपा हुंबे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही व कोणीही शासकीय अधिकारी येथे पोहोचले नाहीत त्यामुळे शासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचे नागरिकांतून चर्चा सुरू आहे.

Related Stories

कोल्हापूर : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्या भावाचा बहिणीवर विळ्याने हल्ला

Abhijeet Shinde

अत्यावश्यक सेवेतील शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना बसतोय जिल्हा प्रवेश बंदीचा फटका

Abhijeet Shinde

अंबाबाईसह इतर मंदिरांच्या दर्शन वेळेत कपात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा

Abhijeet Shinde

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्था कार्यकारी समितीवर चेतन नरके यांची निवड

Abhijeet Shinde

पत्रकारांना पन्नास लाखाचे विमा संरक्षण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!