Tarun Bharat

कोल्हापूर : व्होकेशनलचे रूपांतर रद्द करून सक्षमीकरणच करावे

कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाची ना. मुश्रीफ यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी / वाकरे

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन व्होकेशनल योजनेचे रूपांतर करण्याऐवजी त्याचे सक्षमीकरण करून शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे हित जपावे, गेली तीन दशके राज्यात रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून दिलेल्या या योजनेतील त्रुटी दूर करून ही योजना यापुढेही चालू ठेवावी अशी मागणी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ यांच्या वतीने  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

गडहिंग्लजच्या नगराध्यक्ष प्रा.स्वाती शिंदे- कोरी, जिल्हा बँक  संचालक प्रताप उर्फ  भैय्या माने, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे सचिव प्रा.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ना. मुश्रीफ यांची भेट घेऊन रूपांतरण रद्द करून योजनेचे सक्षमीकरण करावे अशी मागणी केली. याबाबत ना मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत  रूपांतर रद्द करून सक्षमीकरण करण्यासाठी आपण  या योजनेच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन  स्तरावर १९८८ पासून व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू आहेत.या योजनेकडे साधारणतः सहा हजारहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. एक लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात .मात्र राज्य शासनाने ही योजना बंद करून रूपांतर करण्याचा घाट घातला आहे. या महत्वाकांक्षी  व्होकेशनल योजनेतून  ग्रामीण व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना मोफत व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्होकेशनल योजनेतून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित होतात. त्यांना रोजगार व  स्वयंरोजगार  मिळतो. व विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतो .परंतु काही शासकीय अधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांची दिशाभूल करून  या योजनेवर गंडांतर आणण्याचे चालवले आहे. शिक्षकांवर अन्याय होणार आहे.याबद्दल उपस्थित पदाधिकारी यांनी ना मुश्रीफ यांचे लक्ष वेधत  योजनेचे सक्षमीकरण करावे अशी मागणी केली.

शासनाने नेमलेल्या आढावा समितीला देखील विश्वासात न घेता अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे  चांगल्या चालणाऱ्या योजनेत खीळ घालण्याचा उद्योग शासन स्तरावर सुरू आहे .तो त्वरित थांबवून व्होकेशनल योजनेचे सक्षमीकरण करावे व रूपांतर थांबवावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

शिक्षक, विद्यार्थी; पालक, शिक्षण संस्था चालक या घटकांवर अन्याय होऊ देणार नाही असे ना. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले राज्यात चांगल्या प्रकारे चाललेल्या योजनेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून सक्षमीकरण करण्यासाठी लवकरच ना.मलिक यांची भेट घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी  जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालक  संघाचे प्रतिनिधी प्रा.डॉ.सुनील देसाई, भरत काटे,सुधाकर कोरवी, विनोद उत्तेकर, उदय पाटील यांच्यासह व्होकेशनल विभागाचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.

Related Stories

गॅस दरवाढ वृक्षांच्या मुळावर

Archana Banage

कोल्हापूर : हस्तीदंत तस्करीचे ‘कोतोली ते शिमोगा’ कनेक्शन..!

Archana Banage

डॉ. प्रणोती संकपाळ हिचे UPSC परीक्षेत यश

Archana Banage

मनोहर भोसलेसह अन्य भोंदू बाबांच्या विरोधात भाविक एकवटले

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेच्या ‘आपले बजेट’मध्ये आरोग्याची काळजी

Archana Banage

Shivaji University Election: ‘आघाडी’ने दिला ‘सुटा’ला चर्चेसाठी होकार

Archana Banage