Tarun Bharat

कोल्हापूर : शासन आदेशाचे पालन करत सांगरुळमध्ये गणेश उत्सव साजरा

सांगरूळ /वार्ताहर
स्टेजवरील सजीव देखावे आणि विसर्जन मिरवणुकीतील रोडसीनबरोबरच फटाक्यांची आतषबाजी व कर्णकर्कश वाद्यांना बगल देत सोशल डिस्टन्स ठेवत शासकीय आदेशाचे पालन करत सांगरूळ गावामध्ये गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे तीस पस्तीस वर्षापासून सार्वजनिक गणेश मंडळ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मंडळांचे तोडीस तोड सजीव देखाव्यांचे सादरीकरण व भरगच्चं कार्यक्रमांच्यामुळे गणेशोत्सवात दर्जेदार देखावे सादर करणारे गाव अशी समृद्धी जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे.

ऐतिहासिक, पौराणिक व चालू घडामोडीवरील आधारित विषयावर ध्वनिफीत तयार करून मंडळांच्या कलाकारांच्या मार्फत स्टेज देखावे सादर केले जातात. गणेश विसर्जन मिरवणूक कितीतरी रोड सीनमध्ये विनोदी नाटिका सादर केल्या जातात .गणेशोत्सवाच्या महिना-दोन महिने अगोदरच आपला कार्यक्रम उठावदार होण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते राबवत असतात .पण चालू वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी शासनाने सुचविलेल्या सर्व उपाययोजनांचा व नियमांचे काटेकोरपणे पालन करत .सांगरुळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला .
गावातील अजिंक्य क्रीडा मंडळ माळवाडी विभाग ,१६३० द ग्रुप ऑफ मराठाज,श्रीदत्त गणेश धर्मवीर संभाजीराजे ,अष्टविनायक, न्यू क्रांती ,अण्णाभाऊ साठे, आसरा गणेश ,गोल्डन जुबिली, न्यू सुपर, बलभीम तालीम, राधाकृष्ण ,शाहू नाळे तालीम ,बिरोबा गणेश, वन चॅलेंज ,शिवप्रेमी ,न्यू यंग स्टार ,साई गणेश ,कृषिराज, राधे राधे,या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती .गणेश चतुर्थीपासून गौरी गणपती विसर्जनापर्यंत आरती व इतर धार्मिक कार्यक्रम सोशल डिस्टन्स तेवत शासकीय आदेशाचे पालन करत मंडळांनी पार पाडलेत.ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामस्थांनी निर्माल्य व गणपती ग्रामपंचायतीकडे दान केलेत .

Related Stories

कोल्हापूर : विनामास्क फिरणार्‍यांवर मलकापूर नगर परिषदेच्यावतीने दंडात्मक कारवाई

Archana Banage

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुविद्याशाखीय शिक्षणाला महत्व

Archana Banage

महागाईच्या भडक्यात रेडीरेकनर वाढीची फोडणी; वाढीने घरे महागण्याची शक्यता

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : भामटेतील गोकुळ कर्मचाऱ्याची यशस्वी तांत्रिक कामगिरी कौतुकास्पद

Archana Banage

संततधार पावसात शेतकऱ्यांचा आक्रोश

Archana Banage

कोल्हापूर : ट्रकच्या धडकेत गडमुडशिंगीतील वृद्धा ठार

Archana Banage