Tarun Bharat

कोल्हापूर : शाहुवाडीतील शिवारे कापशी परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट

Advertisements

वारणा कापशी / वार्ताहर 

शिवारे, तालुका शाहुवाडी येथे गेले आठ दिवस रोज रात्री शेतामध्ये कुठे ना कुठे तरी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतामध्ये उमटलेले पायांच्या ठशांची वनविभागाकडून पाहणी केली असता ते ठसे बिबट्याचे असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकामध्ये घबराट पसरली आहे. शेतामध्ये जाताना शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत.

शिवारे येथील बारगीर मळा, कुलकर्णी वस्ती, वडशेत व पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. शेतकऱ्यांना शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी आठवड्यातील चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री असा वीज पुरवठा वीज मंडळाकडून होत आहे. परंतु रात्रीच्या वेळेस पिकास पाणी देणे धोक्याचे वाटत आहे. त्यामुळे विद्युत मंडळाने सुद्धा शेतकऱ्यांना दिवसाचा वीजपुरवठा करावा अशी मागणी होत आहे.

शिवारे ग्रामपंचायतीने सुद्धा ग्रामपंचायतीच्या लाऊडस्पीकरवरून बिबट्या पासून सावधानतेच्या सूचना गावकऱ्यांना दिलेल्या आहेत. तरीसुद्धा काही अति उत्साही तरुण कार्यकर्ते रात्रीच्या वेळेस त्या परिसरात जाण्याचे आगाऊ धाडस करत आहेत. परंतु ते धोक्याचे आहे. वन विभागा,ने सर्व माहिती घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

Related Stories

कोल्हापूर : कुपलेवाडी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाने 5 जणांचा मृत्यू, बळींची संख्या दीड हजारांवर

Abhijeet Shinde

रात्री बंद केलेले हॉटेल उघडून जेवण न दिल्याने हॉटेलची मोडतोड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : नियम पाळा अन्यथा चित्रिकरणाचे पॅकअप

Abhijeet Shinde

५ हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु ; 45 प्रवासी तिरुपतीसाठी रवाना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!