Tarun Bharat

कोल्हापूर : शिक्षक बँकेला 2.60 कोटींचा नफा

प्रतिनिधी/कोल्हापूर

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेस 2020-21 या आर्थिक वर्षात 2 कोटी 60 लाखाचा 72 हजाराचा भरघोस नफा झालेला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी दिली. यासाठी बँकेचे सहकारी संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, सेवक वर्ग व हितचिंतक यांचे सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले.

पोतदार म्हणाले, महापूर परिस्थिती आणि त्या पाठोपाठ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेली व्यवहार बंदी, लॉकडाऊन व जागतिक मंदी अशा विपरीत परिस्थितीत देखील बँकेने गुणवत्ता व दर्जा उंचावत ठेवला आहे. कोविड सारख्या महामारीत 6 ते 7 महिने सर्व व्यवहार ठप्प असताना देखील बँकेने एकूण 600 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. बँकेने सर्वच बाबतीत अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. सर्व तरतुदी करून बँकेस 2 कोटी 60 लाखाचा 72 हजाराचा भरघोस नफा झालेला आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. एकमेकाबद्दल असणारा विश्वास, परस्पर सहकार्याची भावना व बँकेचे संघटन कौशल्य व आर्थिक साक्षरता यामुळेच बँकेने आर्थिक मंदीच्या काळातही व्यवसायामध्ये वाढ केलेली आहे.

  या वेळी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील संचालक नामदेव रेपे, जी. एस. पाटील, राजमोहन पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, शिवाजी पाटील, साहेब शेख, दिलीप पाटील, आण्णासो शिरगावे, प्रसाद पाटील, डी. जी. पाटील, बाजीराव कांबळे, सुरेश कोळी, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील, तज्ञ संचालक संदीप पाटील, सुमन पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व अकौंटंट राजेंद्र चौगुले उपस्थित होते

आर्थिक वर्ष 2021 अखेरील सांपत्तिक स्थिती अशी (आकडे लाखात)

भाग भांडवल    2522.50

निधी                1287.45

ठेवी                  34907.29

कर्जे                 25521.45

गुंतवणूक                      11094.84

खेळते भांडवल 40060.67

एकूण व्यवसाय            60428.74

ढोबळ एनपीए 3.21 टक्के

निव्वळ एनपीए            1.96 टक्के

निव्वळ नफा    260.72

सभासदांनी व्यवहार वाढवावेत

बँकेच्या कोल्हापूर जिह्यामध्ये एकूण 11 शाखा असून जिल्हÎातील सर्व सभासद ठेवीदार खातेदार याना बँक सेवा देत आहे. बँकेने आरटीजीएस, एनईएफटी सारख्या सुविधा सभासदाना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे भारतातील कोणत्याही शहरात त्वरित रक्कम ट्रान्सफर करता येते. त्यामुळे बँकेच्या विविध योजनांचा खातेदार व सभासद यांनी लाभ घेऊन व्यवहार वाढवावेत.

प्रशांतकुमार पोतदारअध्यक्ष, शिक्षक बँक

Related Stories

कोल्हापूर : जमावबंदीचा नियम तोडल्यास हॉटेल्सवर कारवाई

Archana Banage

प्रथम हद्दवाढ, मगच निवडणूक

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात संततधार सुरुच

Archana Banage

कोल्हापूर : शुभमंगल … सावधान, दोन मंगल कार्यालयांना दंड

Archana Banage

कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक जिल्हय़ांत रक्ताचा तुटवडा

Archana Banage

१६ राज्यसभेच्या जागांचा आज फैसला? महाराष्ट्रात ‘मआवि’त चलबिचल

Abhijeet Khandekar