Tarun Bharat

कोल्हापूर : शिये येथे तृतीयपंथीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

Advertisements

वार्ताहर / पुलाची शिरोली

शिये रामनगर (ता. करवीर) येथे तृतीयपंथीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील सोन्याचे दागिने लंपास असून दाराला बाहेरून कडी होती. त्यामुळे या तृतीयपंथीचा मृत्यू नैसर्गिक की अन्य कोणत्या कारणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतीश हैबतराव पवार ऊर्फ देवमामा (वय ४२, सद्या रा. रामनगर, शिये, मूळगाव हुपरी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता त्यांना घरातील सोन्याचे दागिने लंपास असून दाराला बाहेरून कडी असल्याचे आढळून आले त्यामुळे हा मृत्यू कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, शिये येथील रामनगरमध्ये सतीश पवार हे गेली दहा वर्षे राहत आहेत. तृतीयपंथी असल्याने त्यांनी आपले आयुष्य देवीचा जोगता म्हणून वाहून घेतले होते. शिये येथेच त्यांनी घर खरेदी केले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्याची चर्चा परिसरात आहे.

आज सकाळी अमृत पवार हे नाष्टा घेऊन घरी आले. त्यांनी सतीश पवार यांना झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना सतीश मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी झाडाझडती सुरू केली आहे.

तीन वर्षापूर्वी सतीश पवार यांच्या घरात मोठी चोरी झाली होती. आजचा मृत्यू नैसर्गिक असेल तर सोन्याचे दागिने आणि घराला बाहेरून कडी हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला आहे.

Related Stories

कोल्हापुरातील २ लाख ७२ हजार ग्राहक पुन्हा प्रकाशात

Abhijeet Shinde

बांधकाम कामगारांचा निवार्‍यासाठी एल्गार

Abhijeet Shinde

जिल्हय़ातील १४ मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वाहतुक सुरू

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांबरोबर आज महत्वपूर्ण बैठक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहतीत तरुण उद्योजकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

कबनूर ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करावी : शिवसेना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!