Tarun Bharat

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात डेंग्यू, चिकनगुनियाचा फैलाव

जिल्हा आरोग्य अधिकारी लक्ष देणे गरजेचे

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ शहर व तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये डेंग्यू व चिकुनगुनियाची साथ मोठ्या फैलावले आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता रुग्ण दाखल होत असल्याने बहुसंख्य दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मूल्यं यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शहरातील प्रत्येक प्रभागात आठ ते दहा रुग्ण आढळून येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी बरोबर आणि खबरदारी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरोळ तालुक्यात शिरोळ, अर्जुनवाड, हसूर, उदगाव, चिंचवड, जयसिंगपूर, कुरुंदवाड या शहरावर व अन्य ठिकाणी डेंगू चिकनगुनियाची साथ सुरू झाली आहे. या साथीमुळे शिरोळमधील एका महिलेचा बळीही गेला आहे. सर्व शहरातील कोळी गल्ली, कुरणे गल्ली, शाहूनगर संगम नगर, समता नगर, माने गल्ली, गावडे गल्ली, इंदिरानगर बेघर, वसाहत शिवाजीनगर यासह अन्य भागांमध्ये या या साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपला घर परिसर स्वच्छ ठेवून ताप अंगदुखी सारखे प्रकार जाणवु लागल्यास तातडीने औषध उपचार घ्यावे. शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड यासह अन्य गांवामध्ये खाजगी रुग्णालयात उपचाराकरता गर्दी होत आहे. तालुक्यातील वैद्यकीय यंत्रणा सतर्क राहणे गरजेचे असतानाही म्हणावा तसा खबरदारीचा उपाय करीत नसल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

राज्य मागासवर्ग आयोगाच झालं काय ?

Abhijeet Khandekar

‘कुंभी’ साखरचे साडे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Archana Banage

कोर्टात हजर करताना आरोपींने केला धूम ठोकण्याचा प्रयत्न

Archana Banage

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठीचे शुल्क रद्द करावे – आ. जयंत आसगांवकर

Abhijeet Khandekar

Kolhapur; कोगे- कुडित्रे दरम्यान वाहतूक बंद; पुलावर अडकला मृत गवा रेडा

Abhijeet Khandekar

बड्यांचा नको, गरिब मराठ्यांचा विचार करा

Archana Banage