Tarun Bharat

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात पाच जण पॉझिटिव्ह ; एकूण संख्या १३० वर

प्रतिनिधी / शिरोळ

गेल्या पंधरा दिवसात शिरोळ तालुक्यात कोरोनामुळे आठ जणांचा बळी गेला असून आज अखेर 130 जणांना बाधा झाली आहे. मंगळवार 21 रोजी 5 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. या संपर्कात आलेल्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी एस दातार यांनी दिली

दत्तवाड ता. शिरोळ येथील एका खाजगी डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात खिद्रापूर एक व सुरत येथील चार असे पाच लोकांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. शिरोळ तालुक्यात कोरोनाने थैमान मांडले असून दतवाड, घोसरवाड, खिद्रापूर, दानवाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी 26 तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. शिरोळ तालुक्यात आज दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

Related Stories

राजधानीत शाही मिरवणूक

Patil_p

उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या न्यायालयात जाऊन बहुमत मिळवावे

datta jadhav

पुणे मिनी लॉकडाऊनला भाजपचा विरोध

Tousif Mujawar

पाडव्या दिवशी सोने खरेदीचा उच्चांक

Archana Banage

शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी बैठक संपन्न

Patil_p

खटाव येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Patil_p