Tarun Bharat

कोल्हापूर : शिरोळ नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांचा राजीनामा

तातोबा पाटील अथवा कुमुदिनी कांबळे यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता

प्रतिनिधी / शिरोळ

येथील नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांनी 19 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदावर नगरसेविका कुमुदिनी कांबळे अथवा तोतोबा पाटील यापैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

शिरोळ नगर परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी संघटनेची सत्ता आहे विद्यमान नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 24 जानेवारी रोजी प्रकाश गावडे यांची उपनगरपदी निवड करण्यात आली होती. ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहे.

सध्या नगरपरिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता आहे. 17 पैकी 9 जागा जिंकून या महाविकास आघाडीने पहिल्या स्थापन झालेल्या नगरपरिषदेत सत्ता संपादन केली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रकाश गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून अनेकजण इच्छुक असून त्यांची मुलाखती घेऊन संधी देणार असल्याचे सांगितले.

Related Stories

कोल्हापूर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ

Archana Banage

कोल्हापूर शहरात स्वतंत्र युनिट करुन दुकाने सुरु करा

Archana Banage

हसन मुश्रीफ- पी. एन. पाटील यांची मुंबईत खलबते

Archana Banage

कोल्हापूर – सांगली पूरग्रस्त उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक

Archana Banage

अलमट्टीच्या उंचीला विरोध करणार..!

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : टीबी निर्मूलनाला कार्टेज तुटवड्यामुळे खो, जिल्हा क्षयरोग केंद्रातील सिबीनॅट यंत्रणा बंद

Archana Banage