Tarun Bharat

कोल्हापूर : शिरोळ येथील मोटर सायकल चोरट्यास अटक

Advertisements

प्रतिनिधी / शिरोळ

इचलकरंजी येथील मोटर सायकल चोरट्यास शिरोळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी धरणगुत्ती ता. शिरोळ येथील ग्रामपंचायत परिसरातून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होती. याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

गुन्हे शोध पथकास संशयित आरोपी युवराज परशुराम पवार अठरा राहणार असारा नगर इचलकरंजी हा मोटर सायकल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती एका बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोलिसांनी वॉच ठेवला असता त्याठिकाणी आरोपी स्प्लेंडर मोटर सायकल घेऊन संस्थेच्या बाहेर थांबला असल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव युवराज परसराम पवार असे सांगितले. त्याला या मोटरसायकलच्या कागदपञाची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने सदरची मोटरसायकल धरणगुत्ती ग्रामपंचायत परिसरातून चोरल्याचे त्याने कबूल केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात येथे मोबाईल चोरी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्याच्यावरील अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर, सानप पोलीस नाईक हनुमंत माळी, पोलीस कॉन्स्टेबल काहिर मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल सागर खाडे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत परब आदींनी केली.

Related Stories

भारत बंद मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे – संपत पवार पाटील

Archana Banage

बेजबाबदार नागरिकांवर कारवाईसाठी पालिकाही रस्त्यावर

Archana Banage

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Archana Banage

गांजा, मोबाईल कळंबा कारागृहातील टोळीसाठी

Archana Banage

कोरोना नियंत्रणासाठी `सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’

Archana Banage

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या विरोधातील ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!