Tarun Bharat

कोल्हापूर : शिरोळ येथे एका घरातील तिघांचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ येथील ग्राम दैवत बुवाफन महाराज मंदिराचे पुजारी स्वामी घराण्यावर एका आठवड्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे वाघजाई ग्रुपचे प्रमुख नागेश हिरेमठ स्वामी या तरुण कार्यकर्त्याचा 25 जून रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले माजी आमदार उल्हास पाटील यांच्या गटाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते तर उल्हास पाटील फाउंडेशन स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता अल्पावधीतच त्याने अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या गळयातील ताईत बनले होते.

एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून अल्पावधीतच त्यांनी नाव कमावले त्यांच्या निधनाने संपूर्ण तरुण वर्ग शोकाकुल असतानाच गुरुवार 27 मे रोजी त्यांचे काका सुरेश हिरेमठ स्वामी यांचे उपचार सुरू असतानाच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले कै नागेश हिरेमठ यांचे वडील रत्नकांत हिरेमठ स्वामी यांना मुलाचा व भावाचा मृत्यू झाल्याने असह्य झाल्याने त्यांनीही राहत्या घरी मंगळवार एक जुन रोजी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली एका आठवड्याच्याआत तिघांचे निधन झाल्याने हिरेमठ स्वामी घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखद घटनेमुळे शिरोळ शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

शाहूवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बेवारस फिरस्ता मुलगा नातेवाईकांच्या ताब्यात

Archana Banage

सीबीआय पोहचली कागलमध्ये, अन् केली चौकशी

Archana Banage

कोल्हापूर : सातार्डेच्या आजीबाईंनी दिला महावितरणला आधार

Archana Banage

किणी येथील ग्रामीण आरोग्य केंद्राला मंजुरी

Archana Banage

छायाचित्रातून शाहूंच्या जीवन कार्यावर प्रकाश

Archana Banage

महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेत बेळगावातील दोन रुग्णालयांचा समावेश

Archana Banage
error: Content is protected !!