Tarun Bharat

कोल्हापूर : सर्वसामान्य रूग्णांवर उपचार कोण करणार?

Advertisements

‘जीवनदायी’ पॅकेज खासगी हॉस्पिटलना परवडेना, रूग्णांना नियमित दराने दाखल होण्याची सुचना

कृष्णात पुरेकर/कोल्हापूर

कोरोना रूग्णांमुळे शासकीय हॉस्पिटल्ससह खासगी हॉस्पिटल्स हाऊसफुल्ल आहेत. त्यातही ‘जीवनदायी’तील कोरोनाचे पॅकेज पाहता खासगी हॉस्पिटल्ससाठी हा खर्च परवडेना झाला आहे. त्यामुळे काही हॉस्पिटल्सकडून नियमित दराने उपचारार्थ दाखल व्हा, अशी सुचना रूग्ण, नातेवाईकांना केली जात आहे. ‘जीवनदायी’तील काही हॉस्पिटल्समध्ये ‘फक्त कोरोना’ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे योजनेतील अन्य रूग्णांची कोंडी झाली आहे. अन्य सर्वसामान्य रूग्णांवर उपचार कोण करणार, हा प्रश्न आहे. कोरोनासह महापुराचे संकट प्रशासनासमोर आहे.  आता सर्वसामान्य रूग्णांवरील उपचाराच्या आव्हानाची त्यामध्ये भर पडली आहे.

जिल्हय़ात कम्युनिटी स्प्रेड सुरू आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या आठ हजारांवर आहे. कोरोनाने 200 वर बळी घेतले आहेत. सद्यस्थितीत सीपीआरसह जिल्हय़ातील इचलकरंजीतील आयजीएम, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयासह 24 कोव्हीड केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तरीही रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने ‘जीवनदायी’तील हॉस्पिटल्संना कोरोना रूग्णांवर उपचाराचे सुचित केले. योजनेतील अनेक हॉस्पिटल्सनी धोका पत्करून फक्त कोरोना रूग्णांवर उपचार सुरू केले. त्याचा ताण अन्य हॉस्पिटल्सवर येत आहे.

महात्मा फुले ‘जीवनदायी’ योजनेत जिल्हय़ात 47 खासगी हॉस्पिटल्स आहेत. यातील 27 हॉस्पिटल्समध्ये फक्त कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रूग्णांसाठी परिस्थितीनुसार 5 हजार ते 65 हजार रूपयांपर्यत पॅकेज आहे. त्यातून अतिदक्षता विभागातील खर्चं पाहता खासगी हॉस्पिटल्सना या पॅकेजद्वारे उपचार करणे आवाक्याबाहेर आहे. ही वस्तुस्थिती असली तरी जिल्हा प्रशासनाकडून या हॉस्पिटल्समध्ये ‘जीवनदायी’तील अन्य रूग्णांवर उपचारासाठी दबाव वाढत आहे.

‘जीवनदायी’तील काही हॉस्पिटल्समध्ये फक्त कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सेवा हॉस्पिटल्सकडून कोरोना संशयित, अन्य रूग्णांना तेथे उपचारासाठी पाठवले जात आहे. पण या रूग्णांना नियमित दराने उपचार घेणार असाल, तर दाखल व्हा, असे सांगण्यात येत आहे. तसेच शासकीय दराने औषधोपचार करा, अशा सुचना जिल्हा प्रशासनाच्या आहेत. तसेच उपचार नाकारणाऱया हॉस्पिटल्सवर प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ‘जीवनदायी’तील हॉस्पिटल्ससह अन्य खासगी हॉस्पिटल्सची कोंडी झाली आहे. त्यांची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

सर्दी, ताप, खोकल्यासह अन्य व्याधीग्रस्तांना उपचारांची गरज आहे. अशा सर्वसामान्य रूग्णांना तातडीच्या उपचाराची गरज असताना ‘कोरोना’ची धास्ती काही हॉस्पिटल्सना आहे. त्यामुळे अशा सर्वसामान्य रूग्णांवर उपचार करताना खासगी हॉस्पिटल्सना मर्यादा येत आहेत. त्यामुळे या रूग्णांवर उपचार कोण करणार, हा प्रश्न आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने सर्वसामान्य रूग्णांवरील उपचारासाठी नियोजन करण्याची मागणी वाढत आहे.

 तर गोल्डन अवरमधील रूग्णांना जीवदान मिळेल..

गेल्या काही दिवसांत औषधोपचार, व्हेटिंलेटर न मिळाल्याने काहींना जीव गमवावा लागला. त्यानंतर प्रशासनाने कोणताही रूग्ण उपचाराविना राहणार नाही, यासाठी नियोजन केले. तरीही ‘कोरोना’ची भीती कायम आहे. हृदयविकार, रक्तदाबाच्या रूग्णांना तातडीने उपचार मिळाल्यास ‘गोल्डन अवर’मध्ये त्यांना जीवदान शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने खासगी हॉस्पिटल्सना जरूर शिस्त लावावी, पण अशा रूग्णांवर प्राधान्याने उपचारासाठी खासगी हॉस्पिटल्सना स्वातंत्र्य देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Related Stories

म्हाडा उभारणार महिलांसाठी वसतिगृह : जितेंद्र आव्हाड

Rohan_P

मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत

Abhijeet Shinde

पन्हाळा तालुक्यात आणखी १३ रुग्णांची भर

Abhijeet Shinde

महे गावातून 10 गाई व एक म्हैस चोरीस

Abhijeet Shinde

गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईला ‘कमळ’ प्रिय; पुढील पाच वर्षेही भाजपाचीच

Abhijeet Shinde
error: Content is protected !!