Tarun Bharat

कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील: केशव उपाध्ये

मुंबई/प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. तर, या दोन्ही जिल्ह्यांना असलेला पुराचा धोका टळावा यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही जिल्ह्यातील पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी भाजप नेते कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरपप्पांशी संपर्क साधत असल्याचे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

दरम्यान, पुराचा धोका टाळण्यासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी अलमाटी धरणातून पाणी सोडले जावे यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु कालपासून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती आहे.

सांगली, कोल्हापूरला निर्माण झालेला पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडावे याकरता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी बोलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश येईल अशी आशा आहे. असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विद्वारे सांगितलं आहे.

Related Stories

सातारा जिह्यात बर्ल्ड फ्लुचा धोका नाही

Patil_p

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Archana Banage

कोल्हापूर : खासगी हॉस्पिटलनाही कोरोना लसीकरणास परवानगी

Archana Banage

धक्कादायक : निवृत्त पोलिसाकडून स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

Tousif Mujawar

आठ तालुक्यात अल्प बाधित वाढ – तीन तालुके निरंक

Patil_p

सात महिन्यानंतर हॉटेल-रेस्टॉरंट सेवेत

Patil_p