Tarun Bharat

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात

पुलाची शिरोली / वार्ताहर

दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामास बुधवारी सुरुवात झाली आहे. यामुळे तरुण भारतचे कौतुक होत आहे. तसेच वाहन धारकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. कोल्हापूर सांगली मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे लहान मोठे अपघात वारंवार घडत आहेत. तर वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ते खड्डे संबंधित विभागाने बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालक मालक यांचेकडून होत होती.

या बाबत कोल्हापूर सांगली मार्गावर खड्यांचे साम्राज्य अशा आशयाची दैनिक तरुण भारतच्या कोल्हापूर दिनांक मध्ये बुधवारी सविस्तर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन कामास सुरुवात केली आहे.

बुधवारी सकाळी मार्बल दुकानासमोर काम सुरू असताना एक मोटारसायकल स्वार खड्डयात गाडी पडून जखमी झाला आहे. हे खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या त्या वेळी गांभीर्याने दखल घ्यावी.- प्रशांत कागले, सामाजिक कार्यकर्ते.

Related Stories

तासगाव कारखाना प्रतिटन २८५० रुपये दर देणार

Archana Banage

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

Archana Banage

कोल्हापूर : अलायन्स एअरची हैदराबाद-कोल्हापूर विमानसेवा अखंडित सुरू

Archana Banage

सांगली : कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विपीन हसबनिसवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Archana Banage

सांगली : यार्डातील हळद हंगाम अर्ध्यावर!

Archana Banage

‘भोगावती’ विरोधी वाहतूक संघटनेचे आंदोलन

Abhijeet Khandekar