Tarun Bharat

कोल्हापूर : सादळेतील सिध्दोबा मंदिराकडील रस्ता बंद

वार्ताहर / शिये

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सादळे (ता.करवीर) येथील सिद्धोबा मंदीराकडे जाणारा रस्ता ग्रामस्थांनी बंद केला असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. किरण भोसले यांनी दिली आहे. तर भाविकांनी दर्शनासाठी येवू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने सादळे येथील सिद्धोबाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या परिसरातील शिये, टोप या गावामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

Related Stories

देशाच्या विकासाच्या सर्व टप्प्यांमध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा

Archana Banage

”महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या घटली”

Archana Banage

… तर आमच्यासाठी आनंदाची बाब : संजय राऊत

Tousif Mujawar

मिशन लोकसभा: निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता? शरद पवारांचे संकेत

Archana Banage

गांधीनगरमधील अपघातग्रस्तास मुख्यमंत्री निधीतून धनादेश

Archana Banage

मलकापुरात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याच्या पुतळ्याचे दहन

Abhijeet Khandekar