Tarun Bharat

कोल्हापूर : सावंतवाडी वनक्षेत्रात वाघाकडून पुन्हा शिकार

वाघ ट्रॅपकॅमेऱ्यात कैद

Advertisements

कोल्हापूर : प्रतिनिधी

‘चंदगड कन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये पट्टेरी वाघाने शिकार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा वाघाने शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे चंदगड, तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह झोन मध्ये वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. शिवाय यावेळी वाघ पाळीव प्राण्यांची शिकार करतेवेळी वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, ‘कन्झर्वेशन रिझर्व्ह’च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला तर गेलाच आहे शिवाय तो संरक्षित सुद्धा झाला असल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दक्षिणेकडील कर्नाटक मधील दांडेली, महाराष्ट्रातील तिलारी, आजरा, चंदगड, विशालगडमार्गे उत्तरेतील चांदोली, कोयनापर्यंत वाघ भ्रमण करीत असतो. राज्य सरकाराने 5 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या ‘आंबोली-दोडामार्ग कन्झर्वेशन रिझर्व्ह’ आणि 22 हजार 523 हेक्टर क्षेत्रावरील ‘चंदगड कन्झर्वेशन रिझर्व्ह’ची घोषणा केली होती. त्यापूर्वी 29.53 चौरस किमीच्या ‘तिलारी कन्झर्वेशन रिझर्व्ह’ची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे या तीनही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास आहे.

Related Stories

कोल्हापूर : कोगे, महे व पाडळी खुर्द ग्रामपंचायत प्रचार अंतिम टप्प्यात ; दुरंगी आघाड्यांचा पदयात्रेवर भर

Abhijeet Shinde

चंदगडी नाट्य़ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Abhijeet Shinde

परत यायचं असेल तर आमचे दरवाजे नेहमी खुले; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना सल्ला

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : सार्वजनिक ग्रंथालयांना लवकरात लवकर अनुदान द्या

Abhijeet Shinde

पेठ वडगावात हिंदू – मुस्लीम ऐक्याचे प्रतिक इमामे हुसेन बादशहा सवारीची स्थापना

Abhijeet Shinde

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थांबविणे हे मोठे आव्हान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!