Tarun Bharat

कोल्हापूर : सीपीआरमधील ‘ट्रॉमा केअर वाॅर्ड’मध्ये आग

सीपीआरकडून कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचा दावा

प्रतिनिधी / कोल्हापूर

येथील सीपीआर कोरोना हॉस्पिटलमध्ये रविवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. वेदगंगा बिल्डींगमधील प्रोमा केअर युनिटमध्ये अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किटने आग लागली तेव्हा तिथे पंधरा रुग्ण उपचार घेत होते. शॉर्टसर्किट झालेल्या खोलीत चार रुग्ण होते. परिचारिकेने आगीची माहिती ड्युटीवरील सुरक्षारक्षकांना दिली. या दोघांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाला दरम्यान आगीची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली. तेही तातडीने हॉस्पिटलमध्ये आले. अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. वार्डमधील 10 रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले. शॉर्टसर्किट झालेल्या रूममध्ये गेल्या चौदा रुग्णांना कृत्रिम श्वसन देत ते अन्यत्र हलविण्यात येत होते.

यावेळी दोघा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायकलवरून हॉस्पिटलला भेट देत पाहणी केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के उपस्थित होते. जिल्हाधिकारी देसाई यांनी यातील रुग्णांच्या वृत्तीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी आगीत कोणतीही जीवित आणि झाली नसल्याचा दावा केला आहे.

Related Stories

कोल्हापूर : कुंभोज येथे पाच दिवसाच्या ‘जनता कर्फ्यू’ला सुरुवात

Archana Banage

मनपाला चार दिवसांचे अल्टीमेटम, अन्यथा सोमवारी वर्कशॉपला टाळे

Kalyani Amanagi

धनदांडग्यांसाठीच महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष

Archana Banage

पुलाची शिरोली-सांगली फाटा चौक सीसी टिव्हीच्या कक्षेत, गुन्हेगारीला बसणार आळा

Archana Banage

Kolhapur; ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये कोल्हापूरच्या शशांक चोथे यांचा सहभाग

Abhijeet Khandekar

ग्रामीण थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन तोडणार

Archana Banage